आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • District Central Bank,latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

26संचालकांची दांडी, बहुतांश संचालक अडकले विधानसभेच्या प्रचारात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हामध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे 26 संचालकांनी पाठ फिरवली. मात्र, सभासदांचा कोरम पूर्ण असल्याने अध्यक्ष-उपाध्यक्ष आणि अन्य दोन संचालकांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभेतील 10 विषयांना मंजुरी देत काही महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. बँकेचे बहुतांश संचालक विधानसभेच्या आखाड्यात उतरले असल्याने विषय मंजुरीसाठी सूचक आणि अनुमोदक अशा तीनच संचालकांना सर्व कसरत करावी लागली.
मासिक बैठकांना दांडी मारणारे संचालक जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेलादेखील गैरहजर राहिले. बहुतांश संचालक विधानसभा निवडणुकीत उमेदवार असल्याने, तर काहींच्या घरातील व्यक्ती निवडणुकीच्या आखाड्यात असल्याने संचालकांनी सभेला येणे टाळले. केवळ अध्यक्ष चिमणराव पाटील, उपाध्यक्ष आर.जी.पाटील, डॉ.सतीश देवकर नानासाहेब देशमुख हे संचालक उपस्थित होते. काही वेळाने मेहताबसिंग नाईक दाखल झाले. या संचालकांनीच आलटूनपालटून विषयांना सूचक आणि अनुमोदकाची जबाबदारी पार पाडली. तसेच विविध कार्यकारी सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी काही सूचना करत संचालक मंडळाला प्रश्न विचारले.
याविषयांचे झाले ठराव
जिल्हाबँकेकडे पडून असलेल्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या शेअर्ससाठी समिती नियुक्त करणे, बँकेच्या संचालकांवर मोबाइलवाटपचा आरोप करणा-यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणे, ग्रामीण भागात आवश्‍यक तेथे शाखा उघडणे आदी ठराव या सभेत करण्यात आला. हे संचालक विधानसभेचे उमेदवार

आमदार चिमणराव पाटील, सुरेश जैन, एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर, डॉ.सतीष पाटील, प्रा.चंद्रकांत पाटील, अनिल भाईदास पाटील, किशोर पाटील, डिगंबर पाटील.