आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Cooperative Bank Elections: Minister Mahajan File Nomination Form

जिल्हा सहकारी बँक निवडणूक : मंत्री महाजन यांचा अर्ज दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव जिल्हा सहकारी बँक तथा जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली. हनुमान जयंतीचा मुहूर्त साधत राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह पाच जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. विद्यमान संचालकांसह दिग्गजांनी पहिल्याच दिवशी तब्बल २४१ अर्जांची खरेदी केली.

शेतकऱ्यांची बँक म्हणून नावलाैकिक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली अाहे. शनिवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली.विकासाे संस्था मतदारसंघातून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जामनेरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच भडगावमधून प्रताप हरी पाटील साधना प्रताप पाटील, जामनेरमधून तुकाराम निकम यांनी अर्ज दाखल केला. भ.ज.वि.जा मतदारसंघातून जामनेरचे श्यामकांत गाेसावी यांनी अर्ज भरला. एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत अाहे. हनुमान जयंतीचा मुहूर्त साधत विद्यमान चेअरमन चिमणराव पाटील, महसूलमंत्री एकनाथ खडसे, संचालक गुलाबराव देवकर, अॅड.रवींद्र पाटील, अामदार सुरेश भाेळे, उपमहापाैर सुनील महाजन, अामदार संजय सावकारे, शिरीष हिरालाल चाैधरी, नानासाहेब देशमुख, ज्ञानेश्वर महाजन अादींनी १७१ अर्ज खरेदी केले अाहेत, अशी माहिती प्रांताधिकारी अभिजित भांडे-पाटील यांनी दिली.