आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Cooperative Milk Union Election Director A.T. Patil

दूध संघातून आमदार पाटलांचा पत्ता कटख्, खासदार ए.टी.पाटलांची वर्णी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; जिल्हासहकारी दूध संघाच्या निवडणूक आखाड्यात उतरलेल्या आमदार गुलाबराव पाटील यांना भाजपने तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती देण्याचे आश्वासन देऊन यावल तालुक्यात करत असलेली उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले होते. मात्र, भाजपने नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या गुलाबराव पाटलांचा पत्ता कापून ऐनवेळी खासदार ए.टी.पाटलांची दूध संघावर तज्ज्ञ संचालक म्हणून वर्णी लावली आहे. या कृतीमुळे भाजप-शिवसेनेतील संबंध ताणले गेले असले तरी, नेत्यांनी मात्र भाऊबंदकी उघड होऊ दिलेला नाही.

जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून प्रथमच पाऊल ठेवू पाहणाऱ्या आमदार गुलाबराव पाटील यांना पहिल्याच प्रयत्नात भाजपने खेळी करून निवडणुकीपासून दूर ठेवले. यावल तालुक्यातून उमेदवारी करणाऱ्या आमदार गुलाबराव पाटील यांना भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी माघार घेण्याच्या सूचना पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडून मिळाल्या होत्या. या माघारीच्या बदल्यात शिवसेनेच्या कोट्यातून त्यांची थेट दूध संघात तज्ज्ञ संचालकपदी वर्णी लागणार होती. मात्र, अमळनेर येथून उदय वाघ यांच्यासाठी माघार घेतलेल्या खासदार ए.टी.पाटील यांनी स्वत:ची तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती करवून घेत आमदार गुलाबराव पाटील यांच्या हाती कमळाचे फूल दिले.
भाजपच्या या खेळीमुळे भाजप शिवसेनेतील भाऊबंदकी उघड झाली आहे. मात्र, नाइलाजाने एकत्र असलेले नेते अद्यापही भाजपकडून न्यायाची प्रतीक्षा करत आहेत. तसेच पक्षातील भाजपविराेधी गट आमदार पाटलांच्या विषयाचे भांडवल करू पाहत आहे. शनिवारी जिल्हा दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून, या सभेत तज्ज्ञ संचालक नियुक्तीचा विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे.

धरणगावमधूननियुक्तीची कायदेशीर अडचण : धरणगावतालुक्यातील प्राथमिक दूध उत्पादक सोसायट्यांचा दूधपुरवठा कमी असल्याने दूध संघाच्या पोटनियमाप्रमाणे धरणगाव तालुक्याला दूध संघावर प्रतिनिधित्व मिळू शकत नाही. येथून थेट संचालक नियुक्ती करण्यास अथवा निवडणूक घेण्यास कायदेशीर अडचण असल्याने येथील जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. दरम्यान, येथे निवडणूक घ्यावी म्हणून काही जणांनी खंडपीठात याचिकाही दाखल केली आहे.
धरणगाव तालुक्यास प्रतिनिधित्वाचे आश्वासन

धरणगावतालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे एक संचालकपद रिक्त असून, या पदावर मला संधी दिली जाणार आहे. तेथूनच नियुक्तीचे आश्वासन मिळाले होते. तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्तीचा विषयच नव्हता. गुलाबरावपाटील, आमदार, जळगाव ग्रामीण
‘भाऊ’बंदकी