आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातेवाइकांनाच घातला लाखो रुपयांचा गंडा, जि.प. बनावट नियुक्ती प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या नावाने जिल्ह्यातील ४६ जणांना बनावट नियुक्तिपत्रे देऊन लाखो रुपयांचा गंडा घातल्याची बाब गेल्या आठवड्यात उघड झाली. या बनावट नियुक्तिपत्रासाठी अटकेत असलेल्या संशयितांनी त्यांच्याच १४ नातेवाईकांना हेरून नोकरीचे आमिष दाखवून प्रत्येकाकडून एक ते दीड लाख रुपयांपर्यंतची रकम तीन वर्षांपूर्वीच जमा केल्याचे पोलिस चौकशीतून समोर आले आहे. 

जिल्हा परिषदेतील बनावट नियुक्ती प्रकरणाचे बिंग फसवणूक झालेल्या उमेदवारांनीच उघड केले आहे. यातील काही उमेदवारांनी राजू भाेजू भाेई अाणि सुभाष भिकन मिस्तरी या संशयितांवर शहर पाेलिस ठाण्यात तक्रार दिल्याने दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. राजू भोई याला मार्च राेजी अटक करण्यात आली. ताे १० मार्चपर्यंत पाेलिस काेठडीत अाहे. तर दुसरा संशयित सुभाष मिस्तरी हा अजून फरारच अाहे. फसवणूक झालेल्या एकूण ४६ जणांपैकी १४ जण राजू भाेई याचे जवळचे नातेवाईक अाहेत. या संगळ्यांना नोकरीच्या आमिशाने लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.
 
नातेवाइकांना हेरले : राजू भोई याने आपल्याच १४ नातेवाईकांना हेरुन त्यांना फसवले आहे. यात संदीप सुरेश भाेई, राजू रमेश भाेई, सचिन प्रकाश भाेई, सुरेश रामलाल भाेई, संजय रामलाल भाेई, अमाेल रमेश भाेई, दीपक राजेंद्र भाेई, संदीप काैतिक भाेई, सतीश उत्तम भाेई, सतीश दिनकर भाेई, अतुल सुरेश भाेई, हेमंत जगन्नाथ भाेई, दिनेश सुरेश भाेई, ज्ञानेश्वर भिका भाेई यांचा समावेश आहे. 

वेगवेगळी कारणे सांगून टाळले 
पैसे देऊनही नियुक्ती मिळत नसल्याने संबंधित पैशांसाठी भोईकडे तगादा लावत होते. मात्र, नेहमीच तो वेगवेगळी कारणे सांगून टाळत होता. कधी अधिकारी बदलल्याचे तर कधी पाऊसच पडला नसल्याची कारणे द्यायचा. त्यामुळे तुमची भरती अाता पाऊस पडल्यानंतर पाणी अाल्यावर हाेईल, असे सांगून या भामट्यांनी सलग तीन वर्षे घालवले. मात्र, फसवणूक झाल्याचे समजल्यावर काहींनी अावाज उठवल्याने या प्रकरणाला वाचा फुटली. 
 
उमेदवारांकडून पैसे घेऊन मिस्तरीला दिले 
संशयित राजू भाेई याने लाेकांकडून पैसे घेतल्याची कबुली पोलिस चौकशीत दिली अाहे. मात्र, सर्व पैसे गोळा करून सुभाष मिस्तरी याला दिल्याचे त्याने सांगितले. तसेच आपण लोकांकडून पैसे घेऊन ते सुभाष मिस्तरीला गांधी उद्यान जिल्हा परिषद कार्यालय परिसरात दिले आहेत. तसेच लवकरच नोकरी लावून देण्याचे आमिषही मिस्तरी उमेदवारांना द्यायचा, असे भाेई याने चौकशीत सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...