आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मिनी मंत्रालया’साठी जळगावात अाज मतदान, २३ ला मतमाेजणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - प्रतिनिधी जिल्हा परिषदेसाठी २५६ तर पंचायत समिती गणांसाठी ५२० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्ह्यातील २३८७ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदान केंद्रापैकी ३३६ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. मतदानासाठी १५ हजार ९०३ अधिकारी - कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहेे. या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती नसली तरी काँग्रेस- राष्ट्रवादीची युती मात्र आहे. अपक्षांमुळे निवडणुकीत रंगत वाढली अाहे. 
 
१५ जि.प.त मतदान 
राज्यातील१५ जिल्हा परिषदा १६५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. १६) मतदान हाेत अाहे. पहिल्या टप्प्यातील जिल्हा परिषदांसाठी एकूण ८५५ जागांसाठी हजार २८९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उर्वरित १० जिल्हा परिषदांचे १० महापालिकांचे मतदान २१ फेब्रुवारी राेजी हाेईल. त्यानंतर दाेन्ही टप्प्यांतील मतमाेजणी निकाल २३ फेब्रुवारी राेजी जाहीर हाेणार अाहेत. राज्यात सर्वत्र इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान होणार अाहे, असे मुख्य निवडणूक अायुक्त सहारिया यांनी सांगितले. 

एक दृष्टिक्षेप 
{जि. प. गट: ६७ 
{ पं.स. गण : १३४ 
{ जिल्हा परिषदेसाठी उमेदवार : २५६ 
{ पंचायत समित्यांसाठी उमेदवार : ५२० 
{ एकूण मतदान केंद्रे : २३८७ 
{ संवेदनशील केंद्र : ३३६ 
{ कर्मचारी : १५९०३ 
मतमाेजणी : २३ फेब्रुवारी 
 
बातम्या आणखी आहेत...