जळगाव - जिल्हापरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी तसेच विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी व्हाॅट्सअॅप प्रणालीनंतर प्रशासनाने आता ‘ईझी स्ट्रॅाम अॅप्स’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही प्रणाली प्रशिक्षणानंतर जानेवारीपासून जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये लागू करण्यात येणार आहे. यासाठी डिसेंबरपासून तालुकानिहाय मुख्याध्यापक, अनुभवी शिक्षकांना अॅप्सचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शिक्षकांच्या हजेरीसाठी प्रशासनाने ईझी अॅन्ड्राइड अॅप्स तयार केला आहे. २८ ऑक्टोबरपासून याची जळगाव तालुक्यातील १०८ शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यात येणार अाहे. यात शिक्षक विद्यार्थ्यांची हजेरी प्रायोगिक तत्त्वावर ईझी स्ट्रॅाम या अॅन्ड्राइड अॅप्लिकेशनमध्ये नोंदवण्यात येणार आहे. उर्वरित तालुक्यात जानेवारी महिन्यापासून ही प्रणाली सुरू करण्यात येईल. यासाठी मुख्याध्यापकांसह शिक्षकांची मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. प्रशिक्षणासाठी विस्तार अधिकारी खलिल शेख, डॉ. डी. एम. देवांग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुका निहाय प्रशिक्षण
डिसेंबर- अमळनेर, धरणगाव. डिसेंबर - भुसावळ बोदवड. डिसेंबर - जामनेर. १० डिसेंबर - चोपडा. ११ डिसेंबर - चाळीसगाव. १४ डिसेंबर - एरंडोल, पारोळा. १५ डिसेंबर- भडगाव, पाचोरा. १६ डिसेंबर - मुक्ताईनगर. १७ डिसेंबर - रावेर यावल. असा प्रशिक्षणाचा कालावधी राहणार आहे.
जानेवारीपासून ‘ईझी स्ट्रॅाम अॅप्स’