आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरुंगातील कैलास सोनवणे यांचा दुचाकीवरून फेरफटका, भटकंती करून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- प्रशांतसोनवणे खून खटल्यातील संशयित आरोपी तथा नगरसेवक कैलास सोनवणे शनिवारी पोलिस बंदोबस्ताशिवाय कारागृहातून निघाले. दुचाकीवर अर्धातास शहरात फेरफटका मारला. या वेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी छायाचित्रकारांनी जिल्हा रुग्णालय गाठल्यानंतर पुन्हा कारागृहात परतता सोनवणे अॅडमिट झाले.
सायंकाळी वाजता छातीत दुखू लागल्यामुळे सोनवणे यांनी रुग्णालयात जाण्यासाठी कारागृह अधीक्षक डी.टी.डाबेराव यांची परवानगी घेतली. कारागृहाबाहेर पडताच एका कार्यकर्त्याच्या दुचाकीवरून ते थेट रुग्णालयात गेले. खुनाच्या गुन्ह्यात संशयित असलेल्या आरोपीला कारागृहातून सहज सोडले गेले. या घटनेमुळे बड्या अारोपींना सवलती दिल्या जात असल्याचे उघड झाले.
कारागृहाबाहेरच यंत्रणा
सोनवणेहे कारागृहाबाहेर पडल्यानंतर तेथे चार-पाच कार्यकर्ते तयारीतच होते. सायंकाळी ५.१५ वाजता त्यातील एका दुचाकीवर बसून ते रुग्णालयाकडे निघाले. ५.३५ वाजता ते पुन्हा कारागृहाकडे आले. मात्र, विविध दैनिकांचे छायाचित्रकार वार्ताहरांना पाहून पुन्हा त्याच दुचाकीने रुग्णालयाकडे गेले. अखेर सायंंकाळी ६.३० वाजता ते अॅडमिट झाले.
रुग्णालयातरिक्षाने गेले
छातीत दुखत असल्यामुळे ते रूग्णालयात गेले. कारागृहातून कैदी नेणारे वाहन नसल्यामुळे त्यांना दाेन गार्डसह रिक्षाने पाठवले. ते रिक्षाने गेले असतील. मात्र, ते दुचाकीने गेले असल्यास या घटनेची माहिती घेतो. डी.टी.डाबेराव, कारागृह अधीक्षक
केसपेपरशिवाय उपचार
सोनवणेएका कार्यकर्त्याच्या गाडीवर बसून रुग्णालयात गेले. त्यामुळे त्यांचा केसपेपर बनवण्यासाठी कारागृहातील गार्ड नव्हता. नोंदंदणी करताच ते दाखल झाले. शेवटी साडेसहा वाजता कारागृहातून गार्ड रुग्णालयात आले.