आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिन्यांत तयार होणार अद्ययावत शवविच्छेदनगृह, शवविच्छेदनगृहाच्या नूतनीकरणाचे काम अखेर सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- अनेकवर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या शवविच्छेदनगृहाच्या नूतनीकरणाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. गेल्या महिन्यात संरक्षण भिंतीचे काम करण्यात आले आहे. नूतनीकरणासाठी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे बांधकाम विभागाचे सहायक अभियंता राजेंद्र जंगले यांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालय प्रशासनाने 20 जूनला सार्वजनिक बांधकाम विभागाला 29 लाख रुपयांचा निधी सुपूर्द केला आहे. मात्र, आचारसंहिता असल्याने तत्काळ नूतनीकरण सुरू करता आले नव्‍हेते. जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहेत. नूतनीकरण पूर्ण होईपर्यंत सध्याच्या शवविच्छेदनगृहाच्या समोर असलेल्या खोलीत शवविच्छेदनाची सुविधा करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.
मृतदेहांचीहेळसांड थांबणार
शवविच्छेदनगृहाचेकाम दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. यात सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे सध्या अनोळखी मृतदेह ठेवण्यासाठी सुविधा नाही. त्यासाठी रुग्णालयाला शवपेट्या प्राप्त झाल्या आहेत. मात्र, त्या शवविच्छेदनगृह लहान असल्याने ठेवता येत नाही. त्यामुळे मृतदेहांची दुर्गंधी पसरल्याने संबंयधित डाॅक्टर, कर्मचारी आणि येणा-या मृताच्या नातेवाइकांच्या अाराेग्याचा प्रश्न िनर्माण झाला अाहे. नवीन पीएम रूममध्ये चार खाेल्या असणार अाहेत. डाॅक्टरांना बसण्यासाठी एक स्वतंत्र दालन, मृताच्या नातेवाइकांना बसण्यासाठी एक खाेली, शवविच्छेदनासाठी एक अािण अनाेळखी मृतदेह ठेवण्यासाठी असलेल्या शवपेट्यांसाठी एक अशा चार माेठ्या खाेल्या असणार अाहेत. प्रत्येक खाेलीत एसी, सीसीटीव्ही असणार अाहे. शवपेट्यांमुळे मृतदेहांची हेळसांड थांबणार अाहे.
असा येणार खर्च
शवविच्छेदनगृहाच्यानूतनीकरणासाठी जिल्हा रुग्णालयाने बांधकाम विभागाला जून महिन्यात २९ लाखांचा निधी दिला. त्यात बांधकामासाठी 16 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित 13 लाखांचा निधी एसी तसेच इतर इलेक्ट्रिकल्स कामांसाठी वापरले जाणार आहेत. या बांधकामाचे काम विलास पाटील या ठेकेदाराला देण्यात आलेले आहेत.
सध्याच्या‘पीएम रूम’ची स्थिती
जिल्हासामान्य रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात सध्या तीन खाेल्या आहेत. त्यात डॉक्‍टारांसाठी एक, शवविच्छेदनासाठी एक आणि एक खोली बेवारस मृतदेह ठेवण्यासाठी आहे, बेवारस मृतदेह ठेवण्यासाठी मात्र शवपेटी नाही. त्यामुळे मृतदेहाच्या अाजूबाजूला बर्फ ठेवून तो सांभाळावा लागतो. त्यामुळे दुर्गंधी पसरते. त्यामुळे संबंिधत डॉक्टर, कर्मचारी आणि येणाऱ्या मृताच्या नातेवाइकांच्या अरोग्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे.