आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकील संघाच्या अध्यक्षपदी लक्ष्मण वाणी तर सचिवपदी गाेविंद तिवारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हावकील संघांच्या अंत्यत चुरशीच्या झालेल्या कार्यकारिणीच्या निवडणुकीत २०३ मते मिळवून अध्यक्षपदी अॅड. अॅड. लक्ष्मण वाणी यांनी बाजी मारली. त्यांनी अॅड. राजेंद्र महाजन यांचा केवळ मतांनी पराभव केला, तर सचिवपदी अॅड.गाेविंद तिवारी यांनी अॅड.बाळू साळी यांचा १०६ मतांनी पराभव केला. दरम्यान, अध्यक्षपदासाठी अॅड.महाजन अाणि अॅड.वाणी यांना सारखीच मते मिळाल्याने पुन्हा मतमाेजणी करण्यात अाली. फेर मतमाेजणीनंतर अॅड. वाणी यांना २०३ तर अॅड. राजेंद्र महाजन यांना २०१ मते मिळाली.

वकील संघाची कार्यकारिणीची साेमवारी वकील कक्षात निवडणुक झाली. यात सचिव पदासाठी अॅड.तिवारी अाणि अॅड.साळी यांच्यात सरळ लढत हाेती. त्यात अॅड.तिवारी यांना ३४० मते मिळाली, तर अॅड.साळी यांना २३४ मते मिळाली. तसेच सदस्यपदी (कंसात मिळालेली मते) अॅड.विनाेद सुकदेव इंगळे (३८५), अॅड.सचिन सुरेश चव्हाण (४१८), अॅड.अशाेक जगन्नाथ महाजन (४२३), अॅड.फिराेज मुनाफ पटेल (३८९), अॅड.अमित दुर्गादास वाघ (३४८), अॅड.मनाेज पांडुरंग पाटील (३९७), अॅड.वीरेंद्र मनाेहर पाटील (३९९), अॅड.संताेष एकनाथ सांगाेळकर (३४३) निवडून आले आहे. सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात अाला.

यांची बिनविराेध निवड
जिल्हावकील संघाच्या निवडणुकीत उपाध्यक्षपदी अॅड.स्वाती राजेंद्र निकम, सहसचिवपदी रुपाली महेश भाेकरीकर, काेषाध्यक्षपदी अॅड.राहुल राधेश्याम झंवर, तर सचिवपदी अॅड.श्रद्धा सूर्यकांत काबरा, अॅड.शीतल प्रभाकर साेनार यांची यापूर्वीच बिनविराेध निवड झालेली अाहे.

दाेन उमेदवारांना समान मते
अध्यक्षपदासाठी तरंगी लढत झाली. त्यात अॅड.राजेंद्र रामदास महाजन अॅड.लक्ष्मण विठ्ठल वाणी यांना समान २०२ मते मिळाली.तर अॅड.पंढरीनाथ बाबुराव चाैधरी यांना १७२ मते मिळाली. दाेघा उमेदवारांना समान मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पुनर्मतमाेजणी केली. यात अॅड. वाणी यांना २०३ तर अॅड. महाजन यांना २०१ मते मिळाली. त्यामुळे अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत केवळ मतांनी अॅड.वाणी हे विजयी झाले आहेत.