आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामनेर तालुक्यातील तीन उपकरणांची राज्यस्तरावर निवड, जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- 40 व्याजिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप सोमवारी झाला. यात पहिल्या क्रमांकाच्या उपकरणाला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संधी मिळणार आहे. त्यानूसार जिल्ह्यातून आठ उपकरणांची निवड झाली असून यात तीन उपकरणे हे जामनेर तालुक्यातील आहेत. १७ ते २१ जानेवारीदरम्यान आंबव (ता.संगमेश्वर, जि.अमरावती) येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होणार आहे.
आर.आर.विद्यालयात सुरू असलेल्या या विज्ञान प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर होते. व्यासपीठावर ‘डाएट’चे प्राचार्य डॉ.आय.सी.शेख, माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर, उपशिक्षणाधिकारी एन.जे.खंडारे, अनिल सोनार, एस.टी.वराडे, सहायक माहिती अधिकारी मिलिंद दुसाने, विज्ञान पर्यवेक्षक बी.डी.धाडी, मुख्याध्यापक डी.एस.सरोदे उपस्थित होते. उत्कृष्ट आयोजनाबद्दल आर.आर.विद्यालयाचा, तर व्यवसाय शिक्षण शैक्षणिक साहित्य मांडणी केल्याबद्दल ‘डाएट’चा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांनी स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरव केला. परीक्षक म्हणून आय.एस.झोपे, शिवाजी औटी, के.एम.राजे, एस.बी.कुळकर्णी पी.आर.श्रावगी यांनी काम पाहिले. रामचंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

विज्ञान प्रदर्शनाचा निकाल असा
प्राथमिकविद्यार्थी गट- प्रथम-समर्थ महाजन न्यू इंग्लिश स्कूल (जामनेर), द्वितीय- सुमीत झोपे (आर.आर.विद्यालय), तृतीय- चिन्मय नेमाडे (बुऱ्हानी इंग्लिश मीडियम स्कूल, पाचोरा), माध्यमिकगट- प्रथम-कल्पेश ललवाणी (लिटील फ्लाॅवर इंग्लिश मीडियम स्कूल, जामनेर), द्वितीय- ताशीब शाह (इकरा उर्दू हायस्कूल, जळगाव), तृतीय- कुलदीप पवार (साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, अमळनेर), आदिवासीक्षेत्र प्राथमिक- प्रथम-सुनील बारेला (प्राथमिक आश्रमशाळा, बोरअजंटी, चोपडा), आदिवासीक्षेत्र माध्यमिक- प्रथम-जगदीश पवार (भा.रा.ग. महाजन विद्यालय, अभोडे बुद्रूक, रावेर). लाेकसंख्याव्यवसाय शिक्षण साहित्य प्राथमिक गट- प्रथम-गणेश राऊत (जिल्हा परिषद शाळा, राहेर, ता.जामनेर), द्वितीय- मोहिनी पाटील (जिल्हा परिषद शाळा, नांद्रा, पाचोरा), तृतीय- शिवाजी निकम (जिल्हा परिषद शाळा, तळशी, ता.चाळीसगाव), लाेकसंख्याव्यवसाय शिक्षण साहित्य माध्यमिक गट- प्रथम-एम.आर.निकम (इंग्लिश मीडियम स्कूल, नांदेड), द्वितीय- डी.सी.बाविस्कर (सर्वोदय हायस्कूल, किन्ही), तृतीय- तुषार गडे (के.एस.अग्रवाल स्कूल, रावेर), प्रयोगशाळापरिचर- प्रथम-एस.एम.सूर्यवंशी (सरदार जी.जी.हायस्कूल, रावेर), शिक्षकशैक्षणिक साहित्य- प्राथमिक- प्रथम-दिनेश माळी (शारदा विद्यालय, साकळी, ता.यावल), शिक्षकशैक्षणिक साहित्य-माध्यमिक गट- प्रथम-अमोल येवले (तात्यासाहेब माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव). वैज्ञानिक उपकरणातून विद्यार्थ्यांनी मांडलेल्या कल्पना वाखाणण्याजोग्या आहे. मात्र, शहरातील एकाही शाळेतील विद्यार्थ्याचे उपकरण राज्य स्पर्धेसाठी पात्र ठरले नाही. दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.