आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Maratha Vidya Prasarak Sanstha's Member Angry On Chief Officer In Annual General Meeting

मुख्य प्रशासकांना धरले धारेवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मोका लागलेल्या संचालक मंडळांकडून संस्थेचे दप्तर ताब्यात घ्यावे, ते देण्यास टाळाटाळ करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, या मागणीसह संस्थेच्या व्यवहाराचे आजपर्यंतचे लेखापरीक्षण करावे, अशी आग्रही मागणी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत रविवारी केली. तासभरात सर्व विषयांच्या मंजुरीसह आयत्यावेळच्या विषयांवर सभासदांनी आगपाखड केली. अँड.तानाजी भोईटे यांच्या कार्यपद्धतीबद्दल संताप व्यक्त करीत नगरसेवक नरेंद्र पाटील यांच्या गटाने मुख्य प्रशासक एम.डी.पाटील यांना धारेवर धरले.

नियोजनबद्ध ठराव मांडणी

संस्थेच्या 68 विभागातील 47 विभागांचे लेखापरीक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. नूतन मराठासह 20 विभागांच्या आर्थिक व्यवहारात लाखोंचा घोळ आहे. गैरव्यवहार उघडकीस आणण्यासाठी लेखापरीक्षण गरजेचे असून ते तत्काळ करण्याची मागणी नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी केली. यासह संस्थेच्या लेखापरीक्षणासह विविध प्रश्नावर एन.जे.पाटील, प्रा.डी.डी.बच्छाव, शशिकांत साळुंखे, किरणकुमार साळुंखे, डॉ.सतीश देवकर, उदय पाटील, सुनील पाटील, नागराज पाटील यांनी तक्रारी मांडल्या. संस्थेच्या आर्थिक उलाढाली व त्यातील गैरव्यवहाराविषयी जिल्हा उपनिबंधकांचे गोपनीय पत्र मोका लावलेल्यांना कसे कळले, असा आरोप विजय पाटील यांनी केला. यावर एम.डी.पाटील यांनी माझ्यावर संशय व्यक्त करू नका, असे सांगत आयुक्तांना विचारून हे पत्र दिल्याचे जाहीर केले.

पुढील दोन महिन्यांत संस्थेच्या सर्व विभागांचे लेखापरीक्षण करून प्रशासनाने अहवाल सादर करावा, अशी आग्रही मागणी प्रा.बच्छाव, उदय पाटील यांनी केली.

एम.डी.पाटील आज राजीनामा देणार

मविप्रचे मुख्य प्रशासक एम.डी.पाटील यांनी या प्रकरणी सहकार आयुक्तांशी संध्याकाळी दूरध्वनीवरून चर्चा केली. सोमवारी सकाळी 10 वाजता जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे राजीनामा देणार असल्याचे ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. यापूर्वीचे प्रशासक करे यांनीही वैयक्तिक कारण पुढे करत राजीनामा दिला आहे.