आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Medical Association Election Issue At Jalgaon, Divya Marathi

जिल्हा मेडिकल असोसिएशनच्या निवडणुकीत धमक्यांचे प्रकार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हा मेडिकल असोसिएशनच्या निवडणुकीचे 6 मे रोजी मतदान होत आहे. सत्ताधारी भंगाळे गट व विरोधक कनकमल राका गटातर्फे सर्व जागांसाठी उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्यानंतर मतदार संपर्कावर भर दिला आहे. असे असताना गुरुवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास विरोधी पॅनलचे प्रमुख कनकमल राका यांना थेट आंतर्देशीय पत्राच्या माध्यमातून धमकी आली आहे. पत्र आले तेव्हा राका हे चोपडा येथे होते. त्यामुळे प्रचार कोणत्या पातळीला पोहोचला आहे, हे समजते. पत्राद्वारे नेमकी धमकी कोणी दिली याचा शोध घेतला जाणार आहे.
यापूर्वी पोलिसांना दिले निवेदन
असोसिएशनचे सदस्य दीपक गजानन जोशी यांनी 19 एप्रिल 2014 रोजी पोलिस अधीक्षकांना पत्र दिले होते. यात जिल्हा मेडिसीन डिलर्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांकडून होणार्‍या त्रासाबाबत पोलिस संरक्षण मिळणेबाबत विनंती करण्यात आली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी संस्थेत मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार केला असल्याने आम्ही त्यांना या निवडणुकीत आव्हान दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. खोट्या व गंभीर स्वरूपाच्या तक्रारी दाखल करण्याच्या धमक्या देत असल्याचे तसेच आमच्या जीवितास काही कमी जास्त होण्याची शक्यता असल्याने संरक्षण मिळण्याची मागणी केली आहे.
पोलिस चौकशीची मागणी
कनकमल राका यांना आलेल्या धमकी पत्रासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली जाणार असून, जिल्हापेठ पोलिसांनी चौकशी करण्याची मागणी केली जाणार आहे.
काय आहे पत्रात?
कनकमल राका यांना उद्देशून ‘तू बाहेरून पोट भरायला जळगावात आला आहे. तू निवडणुकीच्या भानगडीत पडायला नको होते; पण तुझी आता घेरून आली आहे. शिक्षा भोगायला तयार रहा. वाईटपणा पण घेतला आहे लक्षात ठेव. जळगावात तुला आमच्या विरोधात कोणीच मदत करू शकत नाही. या निवडणुकीत तुझी सामाजिक बदनामी होणार व निवडणुकीनंतर तू अजून जास्त बदनाम होणार आहे. शेवटी तुला तुझा धंदा बंद करून येथून जावे लागेल. माणूस सर्व सहन करू शकतो; पण बदनामी सहन करू शकत नाही. देव तुझे संरक्षण करो व तुला अक्कल देवो’ असे नमूद करण्यात आले आहे.