आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 तासांत कामावर हजर व्हा- जिल्हा शल्यचिकित्सक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- संपकरी डॉक्टरांनी 24 तासांच्या आत कामावर हजर व्हावे, असे आदेश सोमवारी जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिले. मात्र, रात्री उशिरापर्यंत कुणीही कामावर हजर झाले नव्हते. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा व कुटीर रुग्णालयांतील 102 वैद्यकीय अधिकारी संपावर गेले होते. त्यामुळे फक्त 10 वैद्यकीय अधिकारी सेवा देत होते.
जिल्हा रुग्णालयात तिघांचा मृत्यू
डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले. सोमवारी यावल तालुक्यातील कठोरा येथील तापी नदीपात्रात एका 50 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. फैजपूर पोलिसांनी हा मृतदेह 2 वाजता नदीतून बाहेर काढला. मात्र, यावल व फैजपूर येथे विच्छेदन करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध न झाल्यामुळे सायंकाळी 4.30 वाजता हा मृतदेह थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. या वेळी डॉ.किरण पाटील यांनी शवविच्छेदन केले. तसेच घशाच्या कॅन्सरमुळे सिव्हिलमध्ये दाखल असलेले वैजनाथ कैलास लोहार (वय 58) यांचा मृत्यू झाला. ते 4 जूनपासून रुग्णालयात दाखल होते.
याशिवाय 3 जुलै रोजी 70 टक्के भाजल्यामुळे दाखल झालेली टीनाबानो रहीम पठाण (वय 22) हिचाही सोमवारी दुपारी 3.45 वाजता मृत्यू झाला. ट्रान्सपोर्टनगरातील प्रकाश प्रल्हाद पवार (ठाकूर, वय 45) यांना ताप आल्याने व उलट्या होत असल्याने 4 जुलै रोजी सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचे सोमवारी 5 वाजता निधन झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.