आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Disturbance Grastance Regret Not Janataca The Doctor Who Scarf

दंगलग्रस्तांचे दु:ख न जाणताच हकीम परतले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-तांबापुरा येथील दंगलग्रस्त भागाची पाहणी करण्याचे निमित्त करून दौर्‍यावर आलेले अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम दंगलग्रस्तांशी संवाद साधल्याविनाच दौर्‍यावरून परतले. नागरिकांची विचारपूस करण्यापेक्षा विर्शामगृहात अधिकार्‍यांकडून माहिती घेणेच पसंत केले. अवघ्या 10 मिनिटांतच पाहणी करून ते नशिराबाद येथे खासगी भेटीसाठी निघून गेले.

दंगलग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुनाफ हकीम यांच्या दौर्‍यासाठी सर्व प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली होती. सकाळी 11.30 वाजता ते तांबापूर भागात आले. अधिकार्‍यांसह त्यांनी काही भागांची पाहणी केली. यादरम्यान ते तेथील एकाही दंगलग्रस्ताशी बोलले नाही. बोलण्याचा प्रयत्न करणार्‍या एका महिलेकडे दुर्लक्ष करून ते नशिराबाद येथे निघून गेले.

‘अजिंठा’मध्ये अधिकार्‍यांची बैठक

नशिराबाद येथील खासगी भेटीनंतर त्यांनी अजिंठा विर्शामगृहात प्रमुख शासकीय अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्या दंगलीची आणि तेथील परिस्थितीची माहिती त्यांनी घेतली. त्या भागात दोन ठिकाणी पोलिस चौकी उभारण्याची मागणी होत असल्याने लोकसहभागातून कायमस्वरूपी चौकी उभारण्याचे आश्वासन पोलिस अधीक्षक एस.जयकुमार यांनी त्यांना दिले. बैठकीला यावेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हा परिषद सीईओ शीतल उगले, अप्पर पोलिस अधीक्षक एन.अबिंका व इतर अधिकार्‍यांची या वेळी उपस्थित होती.

तांबापूर येथील दंगल धार्मिक नव्हती : हकीम


तांबापुरात झालेला प्रकार धार्मिक दंगल नव्हती. तो वैयक्तिक वाद होता. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून संचारबंदी लागू केली होती. यात पोलिसांचे अपयश नसून पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याची माहिती अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दंगलग्रस्तावर 307 कलम लावण्यात आलेले आहे. यात अनेक निरापराध आणि गरीब असल्याने ते जामिनाचा खर्च करू शकत नाहीत. दिवसभरात भेटलेल्या काही लोकांनी हे कलम रद्द करण्याची मागणी माझ्याकडे केली आहे. त्यामुळे मी यासंदर्भात गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. भेटलेले नागरिक, अधिकार्‍यांशी झालेल्या चर्चेतून तेथील जमिनीच्या वादाचे कारणही पुढे आले आहे. आणखी काही जणांना पकडण्यासाठी पोलिसांकडून कारवाईची भीती व्यक्त होत आहे. यासंदर्भात अटकसत्र, कोबिंग ऑपरेशन करू नये, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहे. अवैध धंद्यांना आवर घालण्याचे त्यांनी पोलिस अधीक्षकांकडून आश्वासन घेतले आहे.