आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divisional Commissioner Davale, Latest News In Divya Marathi

विशेष निधीतील कामांना अडथळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव -राज्य शासनाकडून पालिकेस वर्षभरात टप्प्याटप्प्याने 10 कोटींचा विशेष निधी प्राप्त झाला होता. या निधीतील 4 कोटी 50 लाखांतून यापूर्वी पालिकेला कोणतीही रक्कम न टाकावी लागता थेट विकासकामे मंजूर झाली होती. तथापि, आता नव्याने रुजू झालेले विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी पालिकेने या निधीत 50 टक्के रक्कम भरूनच विकासकामे करण्याचे निर्देश दिल्याने पालिकेसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
जकात रद्द करून एलबीटीचा स्वीकार करणार्‍या महापालिकांना राज्य शासनाकडून विशेष निधी देण्यात येतो. जळगाव पालिकेस याच माध्यमातून गेल्या वर्षभरात 10 कोटींचा विशेष निधी टप्प्याटप्प्याने मिळाला होता. त्यातील साडेचार कोटींतून शहरात विविध विकासकामेकरण्यात आली. त्यानंतरही 54 लाखांचा निधी शिल्लक होता. त्यातून कामे मंजूर करण्याचा विषय विभागीय आयुक्तांसमोर गेल्यावर त्यांनी या निधीत पालिकेने 50 टक्के रक्कम टाकण्याचे निर्देश दिल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. विभागीय आयुक्तांच्या या निर्देशामुळे नव्याने प्रस्ताव तयार करून तो तांत्रिक मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे रवाना करण्यात आला आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यावर हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. यापूर्वी विशेष निधीतून कामे करताना पालिकेला 50 टक्के निधी टाकावा लागला नव्हता.