आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश देऊनही पैसे पडून, विभागीय आयुक्त एकनाथ डवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- समाजातील प्रत्येक जण शिक्षित झाला पाहिजे, यासाठी राज्य शासन विविध याेजना राबवत अाहे. मात्र,जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या परीक्षेला बसवण्यासाठी खर्च करण्याचे अादेश देऊनही पैसे खर्च झाले नाही. त्यात राज्यातील जळगाव जिल्हा परिषद एकमेव असल्याची खंत विभागीय अायुक्त एकनाथ डवले यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेत गुरुवारी अाढावा बैठक झाली. त्या वेळी डवले यांनी शिक्षणाधिकारी, गटविकास अिधकारी अािण गटशिक्षण अिधकाऱ्यांची चांगलीच परीक्षा घेतली. या वेळी उपायुक्त पारस बाेथ्रा,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अिधकारी अास्तिककुमार पांडे, उपमुख्यकार्यकारी अिधकारी राजन पाटील, मीनल कुंटे अादी उपस्थित हाेते.
निर्मलग्रामबाबतही नाराजी
जिल्ह्यातनिर्मल भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट ५२ हजार १०७ वरून १५हजार १७३ झाले. त्यापैकी सुद्धा ११ हजार ०२० शाैचालयांचे उद्दिष्ट साध्य झाले. यावर उद्दिष्ट कमी झाल्याबाबत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. इंदिरा आवास योजनांतर्गत हजार ७७० घरकुले मंजूर असून सर्वांना अद्याप पहिला हप्ता वितरित झालेला नाही. याबाबत विचारणा करीत गटविकास अधिकारी यांनी त्वरित कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. मार्चअखेर सर्व योजना पूर्ण कराव्यात, संपूर्ण निधी खर्च होईल, उद्दिष्ट साध्य होईल यादृष्टीनेच नियोजन करण्याची सूचना अायुक्त डवले त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पांडे यांना दिल्या.

बांधकाम विभागाचा आढावा घेण्यात आला. भूमिगत गटारांचे काम शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हावे, अशा सूचना आयुक्तांनी केल्या. तसेच पाणीपुरवठा विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य विभाग, एकात्मिक बालविकास सेवा योजना, पशुसंवर्धन, कृषी, समाजकल्याण अादी सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला.
गटविकास अिधका-यांची केली कानउघाडणी
अाढावा बैठकीत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर डवले यांनी शिक्षणाधिकाऱ्यांसह सर्व गटविकास अिधकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. गुणवत्ता तपासणीसाठी काेणी काय केले? यासंदर्भात विचारणा करून अिधक भरारी पथकांची नेमणूक करण्याचे अादेश दिले. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अनेकांना उत्तर देणे शक्य हाेत नव्हते, त्यामुळे अनेकांची बाेबडी वळली.जिल्ह्यातील सावखेडा येथील शाळेला अायएसअाे मानांकन मिळाल्याने त्यांचे अिभनंदन केले. भाैतिक सुविधांबराेबरच गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याने त्यावर जास्त काम करावे लागणार असल्याचेही डवले यांनी सांिगतले.
गुणवत्ता वाढीसाठी शाळांची सखोल तपासणी करावी, भरारीपथकांची संख्या वाढवावी, विद्यार्थी गुणवत्ता वाढण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. संकलित मूल्यमापन व्यवस्थित होते की नाही, याची तपासणी करण्याची सूचना त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली .
२५ टक्केच विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या परीक्षेला
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत एकूण लाख ९३विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या परीक्षेला बसण्यासाठी पात्र हाेते, ते सर्व परीक्षेला बसले पाहिजे. त्यासाठी जे स्वेच्छेने बसतील, ते अािण ज्यांची शुल्क भरण्याची परिस्थिती नसेल त्यांची िजल्हा परिषदेच्या सेस िनधीतून शुल्क भरण्याचा अादेश िवभागीय अायुक्त डवले यांनी अाॅक्टाेबर महिन्यात घेतलेल्या बैठकीत िदले हाेते. मात्र, गुुरुवारी झालेल्या बैठकीत त्यांनी विचारले असता, केवळ ४३ हजार िवद्यार्थीच िशष्यवृत्तीच्या परीक्षेला बसल्याचे अिधकाऱ्यांनी सांिगतले. सर्वसाधारण सभेत सदस्यांनी िवद्यार्थ्यांचे िशष्यवृत्ती शुल्क भरण्याचा प्रस्ताव मंजूर झाला नसल्याचे सांगितले.
गुणवत्तेत वाढ
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी िवद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली असल्याने डवले यांनी समाधान व्यक्त केले. गेल्या वर्षी श्रेणीत शाळा हाेत्या. मात्र, या वर्षी श्रेणीत २५, श्रेणीत ७०७, श्रेणीत १०४४, श्रेणीत ७३ तर श्रेणीत शाळा अाहेत.

अारोग्याबाबत असमाधान
विद्यार्थ्यांच्याअाराेग्य तपासणीबाबत डवले यांनी विचारले असता, गेल्या बैठकीत लाख १५ हजार विद्यार्थ्यांची अाराेग्य तपासणी करण्याचे ठरले हाेते. मात्र, त्यापैकी केवळ लाख १५ हजार विद्यार्थ्यांचीच तपासणी झाल्याने डवले यांनी अाराेग्य अिधकाऱ्यांना अादेश देऊन खंत व्यक्त केली.