आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षणाने ज्येष्ठ नागरिक झाले ‘कॉम्प्युटर सॅव्ही’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ‘दिव्य मराठी’तर्फे ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी आयोजित मोफत संगणक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या तिस-या बॅचचा समारोप बुधवारी करण्यात आला.
प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणा-यांना याप्रसंगी ‘दिव्य मराठी’चे युनिट हेड विलास जैन यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. प्रथमच अशा प्रकारचे प्रशिक्षण पूर्ण केल्याने प्रशिक्षणार्थीच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता. सर्वच प्रशिक्षणार्थींनी प्रस्तुत उपक्रमाबद्दल ‘दिव्य मराठी’चे तोंड भरून कौतुक केले. चौथी बॅच बुधवारपासून सुरू होत असून पुरुषांसाठी सकाळी 10 ते 11, तर महिलांसाठी सकाळी 11.30 ते 12.30 वाजेच्या दरम्यानची वेळ आहे. प्रशिक्षणार्थींनी याप्रसंगी व्यक्त केलेल्या या काही मोजक्या प्रतिक्रिया...
संगणकाचे ज्ञान मिळाले -‘दिव्य मराठी’ने राबविलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. त्यातून मला संगणकाचे सविस्तर ज्ञान मिळाले आहे. नवीनच माहिती मिळाल्यामुळे खूप आनंद झाला. - रमेश खर्चे
संगणकाचे ज्ञान उपयुक्त - आपण दिलेले संगणकाचे ज्ञान फारच मोलाचे आहे. आजच्या काळात ते अत्यंत उपयुक्त आहे. या उपक्रमामुळे संगणकाची माहिती मिळाली. - दत्तात्रय काळू वाणी
उपक्रमामुळे आवड निर्माण - ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या पुढील आयुष्यात संगणकाची व काम करण्याची उत्सुकता देणारा कार्यक्रम आहे. या प्रशिक्षणामुळे संगणकावर काम करण्याची आवड निर्माण झाली. - देवीदास दामोदर पाटील
संगणक साक्षर झालो - मी पदवीधर असलो तरी संगणकाचे ज्ञान नसल्याने निरक्षर होतो. या प्रशिक्षणामुळे संगणकाची ओळख झाली. संगणक शिकण्याची प्रेरणा मिळाली आहे. - चंद्रकांत कळसकर
बेसिक ज्ञान प्राप्त - ‘दिव्य मराठी’च्या उपक्रमामुळे मला संगणकाचे बेसिक ज्ञान प्राप्त झाले. त्यामुळे संगणक, लॅपटॉपला हात लावण्याची भीती मनातून निघाली आहे. संगणक स्वत: सुरू करू शकते. - उज्ज्वला सुनील वर्मा
आत्मविश्वास आला- ‘दिव्य मराठी’च्या उपक्रमामुळे संगणकाबद्दल मला प्रथमच माहिती मिळाली. प्रशिक्षणामुळे वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला आहे. - रजनी वी. सोनार
शिकल्याचा आनंद - संगणकाचे ज्ञान प्राप्त झाल्याने खूप आनंद झाला. संगणक सुरू करण्यापासून पेंटिंग, इंटरनेट, इमेल आयडीविषयी माहिती मिळाली.- ज्योती मोहनदास पाटील
मौल्यवान ‘गिफ्ट’ - संगणक प्रशिक्षण म्हणजे नूतन वर्षाची मिळालेली ‘गिफ्ट’च आहे. नवनवीन माहिती मिळाली. या उपक्रमामुळे आत्मविश्वास वाढला आहे. - वंदना भटू पाटील