आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Give Efthar Party At Jalgaon, Divya Marathi

दिव्य मराठी’च्या इफ्तार पार्टीत मणियार बिरादरीतर्फे कुरआन वाटप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - divya Marathi givy efthar pary दिव्य मराठी’ आणि जिल्हा मणियार बिरादरीतर्फे सोमवारी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांच्यातर्फे कुरआनचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तिलावत ए कुरआनचे पठण मुफ्ती हारून नदवी यांनी केले. सोहेल आमिर यांनी रोजा व रमजान महिन्याचे महत्त्व सांगितले. उपजिल्हाधिकारी गुलाबराव खरात, पोलिस उपअधीक्षक प्रशांत बच्छाव, केके कॅनचे संचालक रजनीकांत कोठारी, उपमहापौर सुनील महाजन, कमलकिशोर अग्रवाल, भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, विजय चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, प्रमोद सावकारे, नगरसेवक सुरेश भोळे, विष्णू भंगाळे, अख्तर पिंजारी, रोटरीचे गनी मेमन, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा डॉ.अस्मिता पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते, क्रॉम्प्टनचे महाव्यवस्थापक र्शीरंग करंदीकर, प्रभारी युनिट हेड भवानीप्रसाद राव आदींना कुरआनच्या प्रती भेट देण्यात आल्या. इफ्तार पार्टीच्या निमित्ताने सायंकाळी 6 वाजेपासून हिंदू-मुस्लिम बांधवांनी कार्यक्रमस्थळी हजेरी लावली. जमलेल्या हिंदू मुस्लिम बांधवांनी रोजेदारांना शुभेच्छा देत इफ्तार कार्यक्रमाची शोभा वाढवली. फारूख शेख यांनी सूत्रसंचालन केले तसेच ‘दिव्य मराठी’चे युनिट हेड विलास जैन यांनी रोजेदारांना शुभेच्छा देऊन आभार मानले. आलेल्या सर्व मान्यवरांचे ‘दिव्य मराठी’चे जाहिरात विभागाचे चिफ मॅनेजर नौशाद शेख, असिस्टंट मॅनेजर संजीव पाटील यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला मुस्लिम बांधवांनी मोठय़ा प्रमाणात उपस्थिती दिली होती.