आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धापन दिन: ‘दिव्य मराठी’ परिवार उत्सवात चिमुकल्यांची धमाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘दिव्य मराठी’च्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या पाल्यांनी गीत-गायनासह, नृत्याचा ठेका धरत चांगलीच धमाल उडवली. निमित्त होते ‘दिव्य मराठी’च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘दिव्य परिवार उत्सव- स्नेहमिलना’चे. यात कर्मचारी आणि त्यांच्या पाल्यांनी उत्स्फूर्तपणे सादरीकरण केल्याने हा कार्यक्रम उतरोत्तर चांगलाच रंगत गेला.

‘दिव्य मराठी’चा पाचवा वर्धापन दिन रविवारी हॉटेल क्रेझी होममध्ये रविवारी साजरा करण्यात आला. प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ‘दिव्य मराठी’चे सीओओ निशित जैन, स्टेट एडिटर प्रशांत दीक्षित यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सकाळी १० वाजता कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. दुपारी दोन वाजेपर्यंत स्नेहमिलनाचा कार्यक्रम सुरु होता. या वेळी कर्मचारी त्यांच्या पाल्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम दोन तास चांगलाच रंगला. यात कर्मचाऱ्यांनी चित्रपटातील एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली. तर चिमुकल्यांनी “प्रेम रतन धन पायो...’, “तु गनी बावरी हाे गयी से...’ आदी विविध गाण्यांवर बहारदार नृत्य करीत उपस्थितांची दाद मिळवली. तसेच ‘कपल्स गेम शो’ने कार्यक्रमात अधिकच रंगत आणली. यात तीन कपल बोलवून त्यांच्यातील संसाराची केमिस्ट्री कशी जमते, यावर प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर देताना पती-पत्नींनी एकमेकांना किती ओळखतात, याविषयी माहिती मिळाली. यातून विविध विनोद झाल्याने हस्याचे फवारे उडाले. त्यानंतर पुन्हा नृत्य, गीत गायनाचा कार्यक्रम झाला. यात चिमुकल्यांनी बहरादर नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘सैराट’ चित्रपटाच्या गाण्यावर सर्वांनी व्यासपीठावर येऊन ठेका धरला.

चिमुकल्यांनी कापला केक
सांस्कृतिक कार्यक्रमानंतर कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींच्या हस्ते ‘दिव्य मराठी’च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त केक कापण्यात आला. या नंतर मान्यवरांनी चिमुकल्यांना केके भरवला. या वेळी मुलांचा आनंद गगणात मावत नव्हता. त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला.
‘दिव्य परिवार’ उत्सव स्नेहमिलन कार्यक्रमास उपस्थित ‘दिव्य मराठी’चे सीओओ निशित जैन, स्टेट एडिटर प्रशांत दीक्षित, एसएमडीचे स्टेट हेड राकेश चतुर्वेदी, युनिट हेड विलास जैन, एचआर विभागाचे स्टेट हेड प्रणव शहा. मागील रांगेत (डावीकडून) डेप्युटी एडिटर अभिजित कुलकर्णी (नाशिक), कार्यकारी संपादक सचिन काटे (अकोला),डेप्युटी एडिटर प्रशांत पवार (मुंबई), निवासी संपादक जयप्रकाश पवार (नाशिक).
बातम्या आणखी आहेत...