आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजेटमधून माझी अपेक्षापूर्ती; प्रश्न विचारा, उत्तर मिळवा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्याचा अर्थसंकल्प येत्या शुक्रवारी मांडला जाईल. जनतेच्या अपेक्षांची त्यातून कितपत पूर्तता होते हे जाणून घेण्यासाठी दै. 'दिव्य मराठी'ने आपल्या वाचकांसाठी खास उपक्रम हाती घेतला आहे. अर्थसंकल्पाकडून असलेल्या आपल्या अपेक्षा वाचकांनी आम्हाला कळवायच्या आहेत. अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर त्यांची पूर्तता झाली आहे किंवा काय याबाबत आम्ही नेमलेले अर्थतज्ज्ञांचे पॅनल उत्तरे देणार आहे. वाचकांना गुरुवारी सायंकाळपर्यंत व्हाट्स मेसेजच्या स्वरूपात आपले प्रश्न आमच्याकडे पाठवता येतील.

काहीशी बोजड वाटणारी, परंतु जनतेच्या दैनंदिन व्यवहाराशी संबंध असणारी अर्थसंकल्पासारखी घडामोड सोप्या आणि सुलभ शब्दांत वाचकांना कळावी एवढाच या उपक्रमामागचा हेतू आहे. अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे गुरुवारपर्यंत वाचकांनी आपल्या अपेक्षांचा मजकूर मुद्देसूद आणि मोजक्या शब्दांत आम्हाला पाठवायचा आहे. तुमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यासाठी दै. दिव्य मराठीने तज्ज्ञ पॅनल नेमलेले आहे. नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक, शेतकरी, तरुण, महिला आदी समाजघटकांना समोर ठेवून हे तज्ज्ञ सोप्या भाषेत अंदाजपत्रकाचे विश्लेषण करतील.

असे पाठवा प्रश्न
आपल्यामोबाइलच्या व्हाट्स अॅपवरून मुद्देसूद मोजक्या शब्दांत अर्थसंकल्पाकडून असलेली अपेक्षा पाठवावी.
वाचकांनी एका वेळी एकच अपेक्षा पाठवावी. अर्थ क्षेत्राच्या विभिन्न विषयाशी संबंधित तज्ज्ञ त्यावर स्पष्टीकरण देतील.
अपेक्षेखाली तुमचे नाव, शहराचे नाव आणि काय करता त्याबाबतचा तपशील द्यायचा आहे.
तज्ज्ञांचे पॅनल असे...
प्रा.पी.पी.महाजन
अर्थशास्त्र विभागात प्राध्यापक आणि अर्थसंकल्पाचे विश्लेषक.
पंकज अग्रवाल
चार्टर्ड अकाउंटंट आणि अर्थसंकल्पाचे विश्लेषक. नोकरदार, व्यावसायिकांच्या दृष्टिकोनातून विश्लेषण करतील.
वसंतराव महाजन
शेतीनिष्ठ शेतकरी, कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक. शेती अर्थसंकल्पाच्या परस्परसंबंधाचे विश्लेषक.
बातम्या आणखी आहेत...