आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपड्यांचे खोके महामार्गावर फेकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पाळधी-जळगावदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर बांभोरी पुलाच्या जवळपास मे रोजी पहाटे वाजेच्या सुमारास कपड्यांचे खोके बेवारस स्थितीत फेकून देण्यात आले होते. दरम्यान, याबाबत ‘दिव्य मराठी’च्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे पाळधी पोलिसांनी सुरत येथील मालकाचा तपास लावला असून, दोन दिवसांत त्याला पाेलिस ठाण्यात बोलावण्यात आले आहे.
पाळधी-जळगावदरम्यान बांभोरी पुलाजवळ महामार्गावर मे रोजी पहाटे वाजेच्या सुमारास दोन खोके फेकून देण्यात आल्याची बाब ‘दिव्य मराठी’च्या प्रिंटिंग विभागात कार्यरत अनिल यादव यांच्या निदर्शनास आली होती. प्रत्येक खोक्याचे वजन ३८ किलो २०० ग्रॅम होते. ते सुरतकडून कोलकात्याकडे पाठवण्यात येत असल्याचा मजकूर त्यावर होता. मात्र, खोक्यांच्या जवळपास कोणतेही वाहन आढळून आले नाही. संशयास्पदरीत्या फेकून दिलेल्या या खोक्यांची माहिती यादव यांनी पाळधी पोलिसांना दिली. त्यामुळे पाळधी पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल कुशाल पाटील त्यांच्या सहकाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. या वेळी ‘दिव्य मराठी’चे यादव, सोपान माळी, महेंद्र धोबी, कमलेश धनगर, योगेश शिंदे, योगेश पाटील, अमोल नरवाडे, वृषभ मंडाळे, कल्पेश जोशी यांनी पोलिसांना खोके शोधण्यास मदत केली. या वेळी महामार्गालगत अशा प्रकारचे सात खोके आढळून आले. तसेच काही खोके फाटलेले असल्याने त्यात साड्या कपडे असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पाळधी पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यावर हा माल सुरत येथील ‘महाेत्सव ग्रुप’चा असल्याची बाब समोर आली आहे.
तथापि, हा माल सुरत येथून निघाल्यावर जळगाव परिसरात फेकून देण्यात आला की एखाद्या दुर्घटनेत खाली पडला, यासंदर्भातील उलगडा संबंधित मालक आल्यावर होणार असल्याचे पाळधी पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले.
नेमका प्रकार काय?
जळगाव शहरात येणाऱ्या मालावर एलबीटीची आकारणी केली जाते. मात्र, जकात नाक्यापूर्वीच महामार्गालगत संशयास्पद खोके टाकून देण्यात आले होते. हा माल खरच कोलकाता येथे जात होता की, शहरात येत होता ? किंवा वाहनलुटीचा हा प्रकार तर नसावा? या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत.