आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी सरकारची वर्षपूर्ती; उद्योगाबद्दल आशा, महागाईने निराशा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मोदी सरकारला सोमवारी वर्षपूर्ती होत आहे. वर्षभरानंतर जनतेमध्ये उद्योग, परकिय गुंतवणूक याबद्दल आशादायी वातावरण असले तरी दुसरीकडे महागाईने निराशा केल्याचे ‘दिव्य मराठी’ने रविवारी केलेल्या सर्वेक्षणात जाणवले.
केंद्रात पहिल्यादाच मोदी सरकारच्या रूपांने बिगर काँग्रेसी सरकार आले आहे. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचा विविध आश्वासनाच्या माध्यमातून विकासाचे व्हिजन दाखविले होते. त्यामुळे जनतेला मोदी सरकारबाबत प्रचंड अपेक्षा आहे. मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने ‘दिव्य मराठी’ने रविवारी सामाजिक, राजकीय, युवक, डॉक्टर्स, वकील, उद्योजक, व्यापारी, शिक्षक, महिला अशा विविध क्षेत्रातील नागरिकांची मते जाणून घेतली.
‘दिव्य मराठी’ने सर्वेक्षणात चार वेगवेगळ्या मुद्यांवर या जनतेची मते जाणून घेतली. यात सरकारकडून आलेला वर्षभरातला अनुभव, अपेक्षा पूर्ण होतील काय?, स्वच्छता मेक इन इंडिया अभियानाचे भवितव्य काय? आणि मोदींचे परदेश दौरे उद्योग, व्यवसाय आणतील का? आदी प्रश्नांचा समावेश होता. त्यावर नागरिकांनी प्रतिक्रिया दिली. यात अनेकांच्या उद्योगाच्या बाबतील अपेक्षा अधिक होत्या. मोदी यांनी गेल्या वर्षभरात काही देशांचे दौरे केले. या दौऱ्यांमध्ये त्यांनी तरुण, उद्योजकांशी संवाद साधण्याकडे त्यांचा कल होता. भारतीयांना गरिबी बेरोजगारीची समस्या भेडसावत आहे. नेमका हाच मुद्दा सरकारने हेरला असल्याचा अंदाज जनतेने मोदींच्या दौऱ्यातून काढला आहे. परदेशातून उद्योग, भांडवल आणतील, असा आशादायी विचार प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती करताना प्रखरतेने जाणवले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, ‘अच्छे दिन’ विषयी नाराजी...पिक्चर अभी बाकी है...
बातम्या आणखी आहेत...