आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी अंधारात जाण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या हातात मदत द्या!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राज्यातील सत्ताधारी हे रेटून खोट बोलत आहेत. आमच्याच योजनांचे नाव बदलून काम सुरू आहे. यात तर महसूलमंत्री एकनाथ खडसे लबाडांचे मास्टर आहेत. ते जोपर्यंत खोट बोलतायं, तोपर्यंत सर्वकाही व्यवस्थित समजा; मात्र ते खरं बोलायला लागले, म्हणजे सरकारचे काही खरे नाही.
दुसरे मंत्री गिरीश महाजन पाच मी=-मिनिट खुर्चीवर बसले नाहीत. सतत फिरत राहतात. पण काय करणार ‘माकडाच्या हाती कोलीत दिले’ असा चिमटा काढत दिवाळी अंधारात जाण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या हातात मदत द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष किसन धोंडगे यांनी केली.
राज्यात दुष्काळी परिस्थिती असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत हातात द्यावी, अशी मागणी करत मदत दिल्यास जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला. याचसंदर्भात शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात रविवारी जिल्हास्तरीय बैठक झाली. या वेळी किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष धोडगे यांनी टीकेची तोफ डागली. शेतकऱ्यांची परिस्थिती सगळे जाणून आहेत त्यावर उपाय शोधले पाहिजेत. ज्याने आतापर्यंत पोसायचे काम केले, त्याला मदतीची गरज भासतेय. खरिपाचे उत्पादन गेले आहे. दिवाळी अंधारात जाण्यापूर्वी हातात मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. शासनाचे निर्यातीचे धोरण शेतकऱ्याला मारक असल्याचे सांगत शेतकऱ्याने किती पेरावे? किती उगवावे? कुठे विकावे? हे सरकार ठरवणार असेल, तर कसे चालेल. यंदा ३० टक्क्यांपर्यंत अन्नधान्याचे उत्पादन घटेल, असा अंदाज असून असे झाल्यास केवळ वर्षभर पुरेल, एवढाच बफर स्टॉक आहे. त्यामुळे १० टक्के अन्नधान्य कमी पडले तर शासनाची निम्मी तिजोरी रिकामी केली तरी उपयोग नाही, असा इशाराही दिला. शासनाने शेतकऱ्यांना मदत दिल्यास स्वस्थपणे राज्य करू देणार नाही. डिसेंबरअखेर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल. यासाठी गावागावांतून शेतकऱ्यांकडून मुख्य न्यायाधिशांच्या नावाने पत्र तयार करून ते पोस्टाने पाठवण्यात येणार असल्याचेही धोंडगे म्हणाले.

आमच्याच योजनांचे नाव बदलले
सरकारने डिसेंबर २०१४ मध्ये "जलयुक्त शिवार' योजना राबवण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु, पुणे येथे हा कार्यक्रम राबवला गेला. जलपातळी उंचावल्यानंतर नाव बदलून योजना राबवण्यास सुरुवात केली. "महात्मा ज्योतिबा फुले जलसंरक्षण' अभियानाचीही अंमलबजावणी सुरू आहे. गतिमान पाणलोट क्षेत्र हादेखील आघाडीचा कार्यक्रम होता. जलयुक्त शिवार जुनेच असून जलयुक्त व्यवस्थापन नसल्याची टीका माजी आमदार साहेबराव पाटील यांनी केली. शासन महसूल माफ करत असेल, तर जिल्हा परिषदेनेही शेतसारा माफ करावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

शरदपवार डिसेंबरला जिल्हा दौऱ्यावर
राष्ट्रवादीचेअध्यक्ष शरद पवार हे डिसेंबर रोजी जिल्हा ददौऱ्यावर येत असल्याची माहिती माजी जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक यांनी दिली. पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा तसेच शाळेचे उद‌्घाटन होणार आहे. त्यासाठी शरद पवारांनी सहमती दर्शवल्याचेही सांगितले.

सरकारने श्वेतपत्रिका काढावी
देशाचीअवस्था व्यवस्था पाहिली तर सरकारला कृषी अर्थव्यवस्था समजली नाही, असे दिसते. केवळ परदेश दौरे करून उद्योगांत गुंतवणूक वाढवली जातेय. परंतु, कृषी व्यवस्थेत गुंतवणूक वाढवून नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्न झालेला नाही. दुष्काळाची विचित्र स्थिती आहे.
कर्जमाफीशिवाय कर्जमुक्ती कशी होईल? यासाठी सरकारने श्वेतपत्रिका काढावी. तसेच जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याची मागणी विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांनी केली. या वेळी विलास भाऊलाल पाटील कल्पना शिंदे यांनीही सरकार जिल्ह्यातील मंत्र्यांवर टीका केली. बैठकीला जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील, दिलीप वाघ, अरुण पाटील, साहेबराव पाटील, गफ्फार मलिक, माधुरी पाटील, महानगराध्यक्ष परेश कोल्हे आदी उपस्थित होते.