आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदीने झाकोळलेला बाजार प्रकाशोत्सवामुळे तेजाळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बुधवारी वसुबारसने दिवाळी उत्सवाचा शुभारंभ होत आहे. कामगारांचा बोनस, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अग्रीम, अॅडव्हान्स पगार तसेच यंदाचा खरीप हंगाम बळीराजाला सुगीचा गेल्याने बाजारात पैसा येणार आहे. मंदीच्या वातावरणाने झाकोळलेला बाजार प्रकाशाच्या सणाने तेजाळला असून रविवारपासून शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्व बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत. ग्राहकांच़ी पावले खरेदीसाठी बाजाराकडे वळू लागली आहेत. मंगळवारी फुले मार्केट, टॉवर चौक,गोलाणी मार्केट,गांधी मार्केट,संेट्रल फुले मार्केट,दाणाबाजार,सराफ बाजार भाग गर्दीने फुलून गेल्या होत्या.
गेल्या वर्षी दुष्काळाच्या सावटाने मंदीच्या वातावरणात बाजार झाकोळलेला आहे. मागचे वर्ष व्यापाऱ्यांच्या दृष्टीने सुगीचे गेले नाही. उलाढालही मंदावलेली होती. जळगावची बाजारपेठ प्रामुख्याने कृषी आधारित आहे. यंदा पावसाने कृपावर्षाव केल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगाम चांगला गेल्याने सुगीचे दिवस आहेत. दसऱ्यापासून मंदीतून बाजार सावरायला लागला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत बरा म्हणता येईल,अशी अवस्था कायम आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना दिवाळी सणाचे वेध लागले होते. गेल्या तीन, चार दिवसांपासून दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची पावले बाजाराकडे वळू लागली आहेत. सोमवारी मंगळवारी बाजारात खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. बुधवारी वसुबारसने दिवाळीला प्रारंभ होत आहे. धनत्रयोदशी आणि नंतर सुटीच्या मूडमध्ये बाहेरगावी जाण्याचा बेत आखलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी करायला सुरुवात केली आहे. आगामी दोन दिवसांमध्ये बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढणार आहे. याबाबत व्यापाऱ्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. लहानथोरांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी करायला सुरुवात केली आहे. मिठाईची दुकाने, इलेक्ट्रॉनिक्स, कपड्यांची दुकाने, फटाक्यांच्या दुकानांवर गर्दी वाढू लागली आहे .काही ग्राहक वस्तूंबाबत चौकशी करून पसंत पडल्यास नंतर खरेदीचा बेत आखत आहेत.

किराणा व्यावसायिकांनी माल भरला : मंगळवारीफुले मार्केटमध्ये कपडे सहकुुटुंब नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. एरवी नऊ वाजेच्या सुमारास बंद होणारी दुकाने ९.३० वाजेनंतरही सुरू होती. मार्केटमध्ये कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी आकर्षक सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. हे सवलतीचे दर ग्राहकांना भूरळ घालत आहेत. आकाशदिवे, लायटिंगच्या झगमगाटाने बाजारात लख्ख दिसत होता. दिवाळीसणासाठी किराणा व्यावसायिकांनी माल भरला आहे.
चिनी मालावर परिणाम नाही
^चिनी वस्तूखरेदी करण्याबाबत सोशल मीडियावरून जोरदार मोहीम राबवली जात आहे. मात्र, चिनी वस्तू स्वस्त मिळत असल्याने लोक खरेदी करतात. चिनी मालास पर्यायी स्वस्त वस्तू अद्याप बाजारात नाही. त्यापेक्षा थोडा दर जास्त असला तरी ग्राहक खरेदी करतील. मात्र तफावत फार आहे. चायनिज माल खरेदी करण्याबाबत ग्राहकांची नकारघंटा अद्याप तरी नाही . महेशसटाणा, व्यापारी
बाजारपेठेत दीपावली पर्वातील खरेदीचा उत्साह वाढत आहे. खरेदीपर्वातील उधाणात मात्र अद्याप शासकीय कर्मचाऱ्यांनी हात आखडता घेतला असल्याचे दिसून येत आहे. विविध विभागांच्या शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन हातात पडल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान महिन्याअखेर असलेल्या दिवाळीपर्वात चाकरमान्यांची आर्थिक गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने २५ ऑक्टोबरपर्यंत सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना या महिन्याचे वेतन देण्याचे जाहीर केले होते. मात्र, मंगळवारपर्यंत अनेक विभागांमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन बँकेत पडले नाहीत. त्यामुळे अनेकांनी खरेदी पर्वात अडचणी आल्याच्या भावना व्यक्त केल्या. पगारासंबंधीची तांत्रिक माहिती जमा होऊन ती अर्थ विभागामार्फत पगाराची रक्कम ही कोषागारामार्फत बँकेत वर्ग होत असते. मात्र, ही माहिती रखडल्याने अनेक शासकीय कार्यालयांमध्ये मंगळवारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्यांची चर्चा होती. गुरुवारी बहुतांश कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण होतील, असे शहरातील विविध शासकीय विभागांकडून सांगण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...