आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भैरव रागाने रंगली ‘दिवाळी पहाट’, रसिकांना जुगलबंदीचा आनंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - संस्कार भारतीतर्फे शनिवारी आयएमए सभागृहात आयोजित ‘दिवाळी पहाट’ ख्याल गायन अन् भक्तिगीतांनी चांगलीच रंगली. दीपप्रज्वलनानंतर नीळकंठ कासार यांच्या ‘तोडी’ या बहुश्रुत रागातील ख्याल गायनाने सुरेल दिवाळीस सुरुवात झाली. यात ‘तोरी छब मो मनही मन भावे...’ ही विलंबित रचना, तर ‘लंगर कांकरिया जिनमारो’ ही द्रुतरचना त्यांनी सादर केली. यानंतर भूषण खैरनार यांनी ‘तेरो जिया सुख पावे...’, तर ‘बेगी बेगी आवो मंदर’ हा अहिर भैरव प्रसन्न राग सादर केला. एकाहून एक सरस गीतांमुळे रसिक मंत्रमुग्ध झाले होते. या वेळी संस्कार भारतीचे शहराध्यक्ष किशोर सुर्वे, प्रांत कोषप्रमुख राजाभाऊ ठिपसे, काशिनाथ लाठी, प्रा. प्रकाश महाजन, मोहन सपकाळे, अशोक जोशी आदी उपस्थित होते.
दोन्ही गायकांनी ‘बिभास’ रागातील ‘बैरन भाई आज रैन...’ हा मध्यम लयातील ख्याल रंगवून रसिकांना जुगलबंदीचा आनंद दिला. ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल...’ हा संत नामदेवांचा अभंग भूषण खैरनार यांनी, तर ‘अवघे गर्जे पंढरपूर...’ ही भक्तिरचना नीळकंठ कासार यांनी सादर केली. ‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा...’ या भक्तिरसपूर्ण भैरवीने रसिकांची ‘दिवाळी पहाट’ भक्तिरसाने चांगलीच रंगली. या वेळी तबला- दिलीप चौधरी, संवादिनी- गिरीश मोघे, तानपुरा- स्वाती डहाळे, वरुण नेवे यांनी साथसंगत दिली होती.

बातम्या आणखी आहेत...