आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनत्रयाेदशीनिमित्त बाजारात चैतन्य; कपडे, फराळ, वस्तू खरेदीला उधाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - दीपोत्सवाच्या पर्वाला शहरात सुरुवात झाली अाहे. उद्या शुक्रवारी हाेणाऱ्या धनत्रयाेदशी निमित्त बाजारपेठेत खरेदीला उधाण अाले अाहे. गुरुवारी अाग्रा राेडवर खरेदीदारांची एकच गर्दी उसळली. त्यामुळे पाय ठेवणेही कठीण हाेईल, अशी स्थिती झाली. यात कपडे खरेदीसाठी माेठी गर्दी झाली. त्याचबराेबर दिवाळीचा बाजार म्हणून फराळ तसेच झाडू लक्ष्मीच्या मूर्ती खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. खरेदीच्या या उलाढालीमुळे बाजारपेठेत चैतन्य दिसून अाले.
शहरातील बाजारपेठेत गुरुवारी दिवाळीच्या साहित्याच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. दिवाळीनिमित्त शहरात ठिकठिकाणी विविध प्रकारचे फराळ, फटाके विक्रेत्यांबरोबरच तोरण, आकाशकंदील विक्रेत्यांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. या विक्रेत्यांकडे नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली. शहरातील आग्रा रोड, चैनी रोड, गांधी पुतळा, साक्री रोड या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले सेल तसेच गृहाेपयोगी साहित्याच्या सेलमध्येही गर्दीत वाढ झालेली गुरुवारी दिसून आली. उद्या शुक्रवारी धनत्रयोदशीचा मुहूर्त आहे. व्यावसायिक आपल्या चोपड्या बदलत असतात. तसेच रोजनिशीचे पूजन करण्यात येते. तर वैद्यकीय व्यवसायातील निष्णात हे धन्वंतरी पूजन करतात. धन्वंतरी पूजनासाठी आवश्यक असलेल्या साहित्याच्या खरेदीवर विशेष भर दिसून आला. गुरुवारी शहरातील इलेक्ट्राॅनिक्स इक्विपमेंट खरेदीदारांचीही गर्दी दिसून आली. मागील पाच दिवस बाजारपेठेत काहीसे नैराश्य होते. मात्र, काल बुधवारपासून गत आठ दिवसांची तूट भरून निघत असल्याचे चित्र दिसून आले.

फराळासाठी कारागिरांकडेही गर्दी
दिवाळीपाडवा दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरातील फराळ कारागिरांकडे शेवटच्या टप्प्यात फराळ तयार करण्यासाठी नागरिकांची गर्दी झालेली आहे. ५० ते ७० रुपये किलोप्रमाणे फराळ तयार करून घेत आहेत.

लक्ष्मी मूर्ती घेण्यासाठी गर्दी : धनत्रयोदशीतसेच लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मीच्या मूर्ती घेण्याकडे गुरुवारी नागरिकांचा कल दिसून आला. यंदा मूर्तींच्या दरातही पाच ते दहा टक्के वाढ झाली आहे.

चार दिवसांच्या सुट्यांचा योग
शनिवार(िद.२९)पासून मंगळवारपर्यंत सलग चार सुट्यांचा योग शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जुळून आलेला आहे. त्यामुळे आगामी चार दिवसांत बाजारपेठेत अधिक गर्दी होणार आहे. त्यात शनिवारी कलेक्टर घाेषित सुटी, रविवारी शासकीय सुटी, सोमवारी दिवाळी तर मंगळवारी भाऊबीजनिमित्त सुटी राहणार आहे.

फायनान्सचा ग्राहकांना आधार
^दोनतेतीन दिवसांपासून बाजारात चैतन्य वाढलेले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत बाजारपेठेची स्थिती चांगली अाहे. इलेक्ट्राॅनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांना फायनान्स कंपनीच्या सहकार्यामुळे खरेदीदारांची संख्या वाढलेली आहे. कृषी ग्रामीण भागाशी निगडित वस्तूंची विक्री जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात वाढणार आहे. -सुनील भाटकर, संचालक एस.बी.सेल्स
बातम्या आणखी आहेत...