आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभूतपूर्व गर्दी, बाजार चकीत! मुहूर्तावर वाहनांची बुकिंग मात्र गाडीसाठी वेटिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - यंदाच्या दिवाळीत अभूतपूर्व उत्साह दिसून येत असून धनत्रोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदी,दागदागिने आणि दुचाकी-चारचाकी गाड्यांच्या विक्रीने विक्रम केला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणाऱ्या धनतेरसच्या दिवशी शुक्रवारी सराफा बाजारात दोन वर्षानंतर प्रथमच अभूतपूर्व गर्दी दिसून आली. धनतेरसच्या दिवशी सोने-चांदी,दागदागिन्यांची खरेदी शुभ समजली जाते. त्यामुळे मुहूर्तसाधण्याकडे सर्वांचाच कल होता. नव्या डिझाईनचे दागिने आणि घडणावळीर सूट आदी आकर्षक ऑफर्समुळे प्रत्येकजण खरेदीसाठी उत्सुक होता. सोने-चांददीसोबतच यंदा दिवाळीत ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद बघता अाॅटाेमाेबाइल कंपन्या अाणि विक्रेत्यांचे अंदाज साफ चुकले अाहेत. गाड्यांच्या उपलब्धतेच्या १० पट प्रतिसाद मिळत असल्याने ग्राहकांना गाड्या कशा द्याव्यात हे विक्रेत्यांपुढे संकट उभे राहिले अाहे. बुकिंग अाणि वेटिंगचा अाकडा क्षमतेबाहेर गेल्याने या दिवाळीच्या दिवशी विक्रेते ग्राहकांना गाडी देऊ शकणार नाहीत. त्यामुळे केवळ बुकिंगवरच मुहूर्त साजरा करण्याची वेळ ग्राहकांवर अाली अाहे.
धनत्रयाेदशीचा दिवसभर शुभ मुहूर्त असल्याने साेनेपेढींवर नागरिकांनी माेठी गर्दी हाेती. ३० हजार ७०० रुपये प्रतिग्रॅम साेन्याचा भाव असूनदेखील शहरातील माेठ्या साेन्याच्या दालनांमध्ये नागरिकांतर्फे खरेदी करण्यात अाली. दुपारून खास करून अधीक गर्दी होती. यामध्ये फॅन्सी साेने प्रकारात मंगळसूत्र, लक्ष्मीहार, राणी हार, फॅन्सी हारसह कमी वजनातील ब्रेसलेट, पेंडल सेट, चेन, गाेफ, डायमंड साेन्याची अंगठी या दागिन्यांसह शुद्ध साेन्यातील दप्तराचे ओझे जास्त असल्यास संबंधित शिक्षकांवर कारवाई केली जाणार अाहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. जी. पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या वजनाच्या १० टक्केच दप्तराचे वजन असावे. त्यापेक्षा जास्त वजन असेल तर मुलांना पाठदुखी, मणक्याचे आजार, थकवा येेणे, मानसिक ताण, डोकेदुखी यासारखे आजार जडण्याची भीती असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचा भार कमी करण्यासाठी शिक्षकांनी उपाययोजना कराव्या, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. शिक्षकांनी दप्तराची तपासणी करून अनावश्यक दप्तरास शाळेत आणण्यास मनाई करणे अावश्यक आहे.

शाळेतील कपाटाने होणार वजन कमी : दप्तराचेओझे हलके करण्यासाठी शाळांना विद्यार्थी पालकांमध्ये जागृतीसह उपाययोजना करण्याची गरज आहे. एक बेंच-एक पुस्तक, तीन पुस्तके-तीन वह्या, कमी पानांच्या वह्या, जुन्या पुस्तकांची उपलब्धता, पुस्तकांसाठी कपाट, स्वाध्याय पुस्तिका प्रयोगवह्या एकच दिवस आणणे, शुद्ध पाण्याची व्यवस्था याबरोबरच विद्यार्थी पालकांचे समुपदेशन करून दप्तराचे ओझे हलके केले जाऊ शकते.
धनत्रयाेदशी निमित्त पूजा
अापल्याघरातील धनाची पूजा शुक्रवारी करण्यात अाली. तसेच धणे, लाह्या, बत्तासे यांचीही पूजा करण्यात अाली. धन्वंतरीच्या प्रतिमेची कुबेर यंत्राची पूजा करण्यात आली. त्याचप्रमाणे नवीन घेतलेल्या साेन्याची पूजा ही लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर केली जाणार आहे.

यंदाच्या दिवाळीत ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद बघता अाॅटाेमाेबाइल कंपन्या अाणि विक्रेत्यांचे अंदाज साफ चुकले अाहेत. गाड्यांच्या उपलब्धतेच्या १० पट प्रतिसाद मिळत असल्याने ग्राहकांना गाड्या कशा द्याव्यात हे विक्रेत्यांपुढे संकट उभे राहिले अाहे. बुकिंग अाणि वेटिंगचा अाकडा क्षमतेबाहेर गेल्याने या दिवाळीच्या दिवशी विक्रेते ग्राहकांना गाडी देऊ शकणार नाहीत. त्यामुळे केवळ बुकिंगवरच मुहूर्त साजरा करण्याची वेळ ग्राहकांवर अाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...