आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Diwali Vacations Summary Told Teachers Read Books

शिक्षकांनी दिवाळीच्या सुट्टीत पुस्तके वाचून सांगितला सारांश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; पुस्तकरुपी ज्ञान हे माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे अाहे. शिक्षकांनी वेगवेगळ्या विषयांच्या पुस्तकांचे वाचन केल्यास ते विद्यार्थ्यांपर्यंतही पाेहचेल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने फायदेकारक ठरेल, या उद्देशाने विवेकानंद प्रतिष्ठानच्या डाॅ. अविनाश अाचार्य विद्यालयात शिक्षकांसाठी दिवाळीच्या सुट्यांमध्ये अागळावेगळा उपक्रम राबवण्यात अाला.
नेहमी मुलांना काहीतरी वेगळे करायला सांगितले जाते. परंतु यंदा मुख्याध्यापक सूर्यकांत पाटील यांच्या संकल्पनेतून वाचन संस्कृती अधिक वृद्धिंगत हाेण्यासाठी शिक्षकांसाठीच पुस्तक वाचनाचा नंतर परीक्षणाचा उपक्रम राबवण्यात अाला. यात जवळपास ३० शिक्षकांनी वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करून नंतर त्या पुस्तकाचा सारांश इतर सहकारी शिक्षकांना सांगत त्याचे समीक्षणही केले. गेल्या दाेन दिवसांपासून शाळेत प्रत्येक शिक्षक अापले अनुभव सांगत अाहे.

अनेकविषयांची पुस्तके
यातसरश्री तेजपारखी, विश्चास पाटील, वामनराव पै, गिजुभाई बघेका, प्रवीण दवणे, विठ्ठल कामत, अाचार्य चतुरसेन, लुईस अनिता, सुधा मूर्ती, व. पू. काळे, शिवराज गोर्ले, डेव्हीच शेजवळ, चेतना सरदेशमुख, श्याम मराठे, डाॅ. पी. डी. जगताप या लेखकांची माया बाजार, जेथे जाताे तेथे जाणिवा, शब्द मल्हार, अस्तित्व, डाॅलर बहू, पानिपत, जगण्याचा रियाज, रे जीवना, रक्षमा, इडली अाॅर्किड अाणि मी, परीघ, ताेत्ताेचान, सुजाण पालक कस व्हावं?, स्वीकार का जादू, सावर रे, दु:ख- सुख यासारख्या अनेक पुस्तकांचे वाचन शिक्षकांनी केले.

यांनीनाेंदवला सहभाग
यातकेतन वाघ, विजय जगताप, सीमा जाेशी, तारामती परदेशी, संध्या काटाेले, स्वाती बेंद्रे, राजेंद्र जंजाळे, वंदना सावदेकर, गजानन काेळी, सचिव गायकवाड, प्रमाेद इसे, पूजा साळवी, प्रतिभा चाैधरी, चंचल रत्नपारखी, कविता पाटील, सीमा चाैधरी, मनीषा पाटील, याेगिता राणे, जयश्री पाटील, सविता चाैधरी, कांचन देशपांडे, याेगेश जाेशी, छाेटू पाटील, सीमा पाटील, पूनम दहिभाते, शिल्पा मांडे, जयश्री वंडाेळे, रंजना बाभूळके, देवेंद्र काेल्हे, सीमा जाेशी या शिक्षकांनी सहभाग नाेंदवला.

ज्ञानाचा खजिना वाढेल
शिक्षकांचाशब्दसंग्रह वाढताेय, अनेक अनुभव एेकायला मिळतात. त्यामुळे मुलांना परिपाठाप्रसंगी ते सांगू शकतील. एक नवीन पिढी शिक्षक घडवताे, घराघरात पाेहाेचताे. त्यामुळे जेवढे नवीन शिकत राहतील, तेवढा ज्ञानाचा खजिना वाढेल. सगळ्यांना ताे खजिना मिळेल त्याचा फायदा हाेईल. मुले घडतील, देशही घडेल. सूर्यकांत पाटील, मुख्याध्यापक

प्रत्येकाला ३० पुस्तकांची माहिती
यातदिवाळीच्या सुट्टीत शिक्षकांनी एका पुस्तकाचे वाचन केले. त्यानंतर त्या पुस्तकाचे लेखक, प्रकाशन, कितवी अावृत्ती, त्यामध्ये लेखकाने कशावर जास्त भर दिला अाहे, अशी माहिती ही प्रत्येकाने २० मिनिटे सांगितल्याने कमी वेळात खूप जास्त पुस्तके वाचण्याचा शिक्षकांना अनुभव अाला. राजकीय, सामाजिक प्रबाेधनाची, काैटुंबिक अनेक विषयांचा यात समावेश हाेता.