आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी अपघातात डाॅक्टरचा मृत्यू, अपघातानंतर रात्रभर रस्त्यावर मृतदेह पडून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- वावडदाते शिरसोली दरम्यान नेव्हेरे शिवारात दुचाकी अपघातात शिरसोली येथील ज्येष्ठ डॉक्टराचा मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना रविवारी रात्री वाजेनंतर घडल्याने रात्रभर मृतदेह रस्त्यावर पडून हाेता. साेमवारी सकाळी वाजता वाहनधारकांना लक्षात अाल्यानंतर घटना उघडकीस अाली. 
 
शिरसोली प्र.बो. येथील डाॅ.उत्तमराव पाटील (वय ६२) हे मूळचे वडजी (ता.भडगाव)येथील आहेत. रविवारी ते वडजी येथे शेतीच्या कामानिमित्त गेले होते. सायंकाळी वाजता ते दुचाकीने शिरसोली येथे घरी येण्यासाठी निघाले होते. रात्री वाजता ते वडली (ता.जळगाव) येथे पोहचले. तेथून त्यांनी मुलगा प्रवीण याला फोन करून घरी येत असल्याची माहिती दिली; परंतु डॉ.पाटील रात्रभर घरीच आले नाहीत. शिरसोली नेव्हेरे शिवारातील टेकडीजवळ त्यांची दुचाकी घसरल्यामुळे किंवा दुसऱ्या एखाद्या वाहनाच्या धडकेमुळे त्यांचा अपघात झाला. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे डाॅक्टराचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे ते दुचाकीसह रस्त्याच्या कडेला जाऊन पडले होते. त्यांचा एक पाय दुचाकीच्या खालीच दाबला गेला होता. सोमवारी सकाळी वाजता परिसरातून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांना हा अपघात लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच अपघाताचे वृत्त शिरसोली गावात पसरल्यानंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. 

डाॅ.पाटील यांचा अपघात झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.डॉ.पाटील यांच्या पश्चात पत्नी विमलबाई, मुलगा प्रवीण, मीनाक्षी वैशाली अशा दोन विवाहित मुली, दाेन सुना नातवंडे असा परिवार आहे. डॉ.पाटील यांचा मोठा मुलगा मिलिंद यांचे १० वर्षापूर्वी निधन झाले आहे. 
 

३२ मिस्् कॉल 
डॉ.पाटीलयांनी रविवारी रात्री वाजता वडली येथून मुलगा प्रवीण यांना फोन केला होता. त्यांनतर रात्री ११ वाजेपर्यंत देखील ते घरी परतले नव्हते. रात्री वाजता शिरसोली येथे एका मीटिंगला त्यांना हजेरी लावायची होती; परंतु तेथेही ते पोहचले नव्हते. त्यामुळे रात्री ११ वाजेपासून कुटुंबीयांनी त्यांना फाेन करण्यास सुरुवात केली पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. पहाटेपर्यंत डाॅक्टरांच्या मोबाइलवर ३२ मिस् कॉल होते. सिव्हिलमधून मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर कुटुंबीयांनी डाॅक्टरांचा मोबाइल तपासल्यानंतर माहिती समाेर अाली. 
बातम्या आणखी आहेत...