आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Doctor News In Marathi, Physicians Indifference Issue At Jalgaon, Divya Marathi

उपचारार्थ गेलेल्या सर्पमित्राला भोवली डॉक्टरांची बेपर्वाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- तबेल्यात आढळून आलेल्या नागाला वाचविण्यासाठी गेलेल्या शेख अली या सर्पमित्राला त्याने दंश केला. भुसावळ येथील खडकारोड भागातील शेख इर्शाद यांच्या तबेल्यात रविवारी दुपारी 12.30 वाजता ही घटना घडली. दरम्यान भुसावळ पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, पोलिस केसचे कारण सांगून डॉक्टरांनी बेपर्वाईने उपचार करण्यास नकार दिल्याने त्यांच्या शरीरात विष पसरून ते अत्यवस्थ झाले होते. डॉक्टरांचा बेजबाबदारपणा त्यांना भोवला.

दरम्यान, भुसावळचे सर्पमित्र अँलेक्स प्रेसडी यांनी घटनास्थळ गाठून अलीला त्याच अवस्थेत वरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. या ठिकाणी अँण्टी स्नेक व्हेनमचा (प्रतिसर्प विष) डोस दिला आणि रुग्णाला जिल्हा रुग्णालयात पाठविले. त्यांना दुपारी 2.45 वाजता तेथे दाखल करण्यात आले. डॉ.निखिल पाटील यांनी दुपारी उपचार सुरू केले. रात्री 8.00 वाजेपर्यंत 11 प्रतिसर्प विषाचे डोस दिले होते. त्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. थोडक्यात त्यांचा प्राण वाचला.

दरम्यान भुसावळ येथेच अलीवर उपचार व्हायला हवे होते, अत्यवस्थ असतानाही भुसावळच्या डॉक्टरांनी बेजबाबदारपणे त्याच्यावर उपचार न केल्याची संतप्त प्रतिक्रिया सर्पमित्र बाळकृष्ण देवरे, रवींद्र पाटील, सचिन ठाकूर, योगेश गालफडे यांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केली.