आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णांची पाठ; खाटा ओ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संपावर आहेत. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने संप मागे घेतल्यानंतर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. संपकरी डॉक्टरांनी मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.
या संपाचा परिणाम रुग्णांवर होऊ लागला आहे. दररोज सरासरी 700 रुग्ण तपासणीसाठी येत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात गुरुवारी केवळ 24 आणि शुक्रवारी 370 रुग्ण तपासणीसाठी आले होते. तसेच 400 खाटांच्या रुग्णालयात 249 रुग्ण सध्या उपचार घेत आहे. संपामुळे रुग्णांनीही जिल्हा रुग्णालयाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

लवकर निर्णय घेतला नाही तर...
आरोग्य विभागाने मॅग्मा संघटनेच्या मागण्यांवर लवकर तोडगा काढला नाही तर परिस्थिती आणखीनच बिकट होणार आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आर. के. शेळके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्यरुग्ण विभाग डॉ. राजकुमार सूर्यवंशी हे तीनच डॉक्टर कार्यरत आहेत. उरलेले सगळे डॉक्टर शिकाऊ आहेत. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर रुग्णालयातील परिस्थिती आणखीनच बिकट होऊ शकते.

400 खाटांच्या रुग्णालयात 249 रुग्ण
रुग्णांसह नातेवाईकांची गर्दी. बेड शिल्लक नसल्याने अनेक रुग्ण जमिनीवर झोपलेले. असे चित्र नेहमीच जिल्हा सामान्य रुग्णालयात बघायला मिळते. डॉक्टरांच्या संपामुळे 400 खाटांच्या रुग्णालयात सध्या सर्वत्र शुकशुकाट दिसतो, केवळ 249 रुग्ण दाखल आहेत. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आर.के. शेळके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील, डॉ. राजकुमार सूर्यवंशी, डॉ.उल्हास तासखेडकर, डॉ.एस.एस. बन्सी या पाच डॉक्टरांवर सध्या मदार आहे.

रुग्णालयप्रकरणी मनसेचे निवेदन
डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल होत असून, शवविच्छेदन आणि इतर उपचारांसाठी रुग्णांची फरपट सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात जिल्हाधिका-यांनी लक्ष घालून मार्ग काढावा, असे निवेदन मनसेतर्फे जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहे. या वेळी जिल्हा सचिव जमील देशपांडे, महानगराध्यक्ष चंदन कोल्हे, दिलीप सुरवाडे, शहर सचिव सुनील पाटील, अ‍ॅड.सचिन मराठे, जितेंद्र करोसिया, आशिष सपकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.