आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांची फी महागणार; दुपटीने वाढवण्याचा घाट!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सर्दी-पडसे, तापासारखे किरकोळ आजारही यापुढे महागणार आहेत. शहरातील जनरल प्रॅक्टिशनर्सच्या तपासणी शुल्कात येत्या मार्चपासून दुपटीने वाढ करण्याचा घाट घातला जात आहे. विशेष म्हणजे, नोव्हेंबर-डिसेंबर २०१४ मध्ये खासगी डॉक्टरांनी तपासणी शुल्कात वाढ केली होती. आता तीनच महिन्यांत तिसऱ्यांदा वाढ करण्याचा निर्णय घेण्यासाठी डॉक्टरांच्या झोननिहाय बैठकांचा सपाटा सुरू आहे. दरम्यान, प्रत्येक डॉक्टरने आपल्या तपासणी शुल्कात वाढ करावी यासाठी दबाव आणला जात असल्याचे म्हटले आहे. मात्र, शुल्कवाढीस कडाडून विरोध केला आहे.
शहरातील एमबीबीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी इलेक्ट्रोपॅथी या डॉक्टरांना निमा आयएमए या संघटनांच्या धर्तीवर एकछत्राखाली आणण्यासाठी शहराचे सहा झोनमध्ये विभाजन करून बैठका सुरू आहेत. या बैठकांमध्ये डॉक्टरांच्या हिताच्या अनेक मुद्यांसोबत फीवाढ करण्याच्या विषयावर जोर दिला जात अाहे. शहरातील प्रत्येक जनरल प्रॅक्टिशनर्सने वाढवलेल्या फीनुसारच आकारणी करावी; अन्यथा संबंधित डाॅक्टरांवर दंडात्मक कारवाई करण्याचाही निर्णय घेण्याची तयारी सुरू आहे. ही फी वाढ मार्चपासून लागू करता येईल का? यावरही गंभीरपणे विचार सुरू आहे.
अंतर्गत विरोध
अत्यंतकिरकोळ आजारांसाठी नागरिक घराजवळच्या जनरल प्रॅक्टिशनर्सकडे उपचारासाठी जात असतात. बऱ्याचदा आर्थिक परिस्थिती नसल्यानेही एमडी मेडिसिनकडे जाणे परवडत नाही. म्हणून जनरल प्रॅक्टिशनर्सकडे आशेने पाहिले जाते. सर्दी-पडसे, ताप, खोकला या सारख्या किरकोळ अाजारांसाठी अव्वाच्या सव्वा फी आकारणी केल्यास रोष निर्माण होऊ शकतो. यामुळे बहुसंख्य डॉक्टरांनी फीवाढीला विरोध करायला सुरुवात केली आहे.
संघटनेसाठी प्रयत्न
विविधपॅथींमध्ये उपचार करणाऱ्या शहरातील जनरल प्रॅक्टिशनर्सची अद्याप एकही एकछत्री संघटना कार्यरत नाही. सध्या शहरातील डाॅक्टरांना एकत्रित करून निमा आयएमए संघटनेच्या धर्तीवर मजबूत संघटना स्थापन करण्याचा विचार डॉक्टरांमध्ये आहे. अद्याप संघटनेची स्थापना झाली नसली, तरी डॉक्टरांच्या बैठकांना वेग आला आहे. त्यातून अनेक विषय चर्चेत येत असून, फीवाढीचाही एक मुद्दा मांडला जात आहे.
अशी असू शकते वाढीव फी
शहरातीलजनरल प्रॅक्टिशनर्सने नोव्हेंबर २०१४मध्ये तपासणी फीमध्ये १० रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर डिसेंबरमध्येही काही डॉक्टरांनी वाढ केली होती. आता सध्या तपासणी फी २० ते ३० रुपये आकारली जाते.
सर्वसामान्य रुग्णांवर नाहक बोजा
सध्या वेगवेगळ्या पॅथीच्या डॉक्टरांच्या बैठका सुरू आहेत. यात सगळ्यांनी एकत्र येऊन संघटना स्थापन करण्यासह विविध विषयांवर चर्चा होते. त्यात सध्याच्या ‘फी’मध्ये आणखी वाढ करण्याचाही विषय आहे. काही डॉक्टर फीवाढीसाठी प्रयत्न करीत आहेत; परंतु बहुसंख्य डॉक्टरांचाच याला विरोध आहे. फीवाढीमुळे सर्वसामान्य रुग्णांवर नाहक बोजा पडेल. -एक डॉक्टर