आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांची फी ठरतेय डोकेदुखी, त्रिपुरात डॉक्टरांच्या तपासणी शुल्कावर उच्च न्यायालयाचा अंकुश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - तापाने फणफणलेले श्रीयुत कुलकर्णी जवळच्याच एका दवाखान्यात गेले. एमबीबीएस डॉक्टरांनी तीन दिवसांच्या गोळ्या देऊन त्यांना पुन्हा येण्यास सांगितले. तीन दिवसांनंतरही गुण आला नाही म्हणून कुलकर्णींनी दुसऱ्या एमबीबीएस डॉक्टरचा सल्ला घेतला. दोन्ही डॉक्टरांची पदवी एकच पण पहिल्या डॉक्टर महाशयांनी त्यांच्याकडून १०० रुपये तपासणी शुल्क घेतले तर दुसऱ्या डॉक्टरांनी ३० रुपये घेतले.

वैद्यकीय पदवी एकच असूनही दोन डॉक्टरांच्या तपासणी शुल्कातील तफावतीचा हा अनुभव प्रत्येकालाच येत आहे. वीजबिल, एसटी बस, रेल्वे यासारख्या अत्यावश्यक सेवांमध्ये युनिट प्रवासाच्या अंतराप्रमाणे दर आकारले जात असताना वैद्यकीय सुविधेसारख्या जीवनावश्यक सेवेमध्ये तपासणी फीमध्ये एकसूत्रीपणा, समानता नाही. डॉक्टरांच्या तपासणी शुल्कावर कोणत्याही संस्था,संघटनेचे तर सोडाच राज्य अथवा केंद्र सरकारचेही नियंत्रण नाही.विशेष म्हणजे त्रिपुरा सारख्या राज्यात उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर निकाल देताना शासकीय सेवेतील डॉक्टरांच्या प्रॅक्टीसवर कडक निर्बंध लादले आहेत त्याचप्रमाणे तपासणी शुल्कही पदवीप्रमाणे निर्धारित केले आहे.

सोने, केळी, कापूस, शिक्षण या क्षेत्रापाठोपाठ वैद्यकीय हब म्हणूनही जळगावची ओळख नावारुपाला आली आहे. तज्ज्ञ डाॅक्टरांच्या पदव्या आणि सुविधा सारख्या असल्या तरी प्रत्येकाची तपासणी फी वेगवेगळी असल्याने रुग्णांचा गोंधळ उडतो. तपासणी शुल्कामागे नेमके काय गौडबंगाल आहे, याचा ‘दिव्य मराठी’ने धांडोळा घेतला. त्या वेळी अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. तपासणी शुल्क किती आकारावे, कधी वाढ करावी हे संबंधित डॉक्टरांच्या मर्जीवर अवलंबून असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

समान फीसाठी प्रयत्न
बैठकांमध्येसमान फीचा मुद्दा अनेक वेळा चर्चेत आला. मात्र, त्यावर एकमत होऊ शकले नाही. डाॅक्टरांच्या फी वर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा नाही. डाॅक्टर स्वत:च त्यांची फी निश्चित करतात, असे असले तरी त्यासाठी त्यांचे शिक्षण, अनुभव आणि कौशल्य या गोष्टी पाहिल्या जातात. वैद्यकीय क्षेत्रात नवोदित डाॅक्टरांनी अनेक वर्ष शिक्षणात घातले असतात. ते फी कमी ठेवू शकत नाही. तर अनुभवी डॉक्टर अनेक वर्षांची सेवा, सामाजिक बांधिलकी यामुळे ते जास्त फी वाढवत नाहीत. त्यामुळे फी समान ठेवणे शक्य झाले नाही. अनिलपाटील, सचिव,आय.एम.ए.

असे आहेत डाॅक्टरांचे दर
एमएस २०० ते ५०० रुपये
एमडी १०० ते ५०० रुपये
एमबीबीएस ३० ते ४०० रुपये
जनरल प्रॅक्टिशनर ३० ते १५० रुपये

त्रिपुरामध्ये डाॅक्टरांच्या फीवर अंकुश
त्रिपुराउच्च न्यायालयाने जून महिन्यात शासकीय नाेकरीतील डाॅक्टरांच्या तपासणी शुल्कासंदर्भात निर्देश दिले आहेत. त्यानुसार शासकीय सेवेतील डाॅक्टरांना केवळ घरी अथवा स्वत:च्या भाड्याने घेतलेल्या दवाखान्यात प्रॅक्टिस करता येईल. खासगी रुग्णालय,नर्सिंग होम अथवा डायग्नोस्टीक सेंटरमध्ये काम करता येणार नाही.

तपासणीशुल्कावर निर्बंध
न्यायालयाच्याआदेशानुसार तपासणी शुल्कही निर्धारित करण्यात आले आहे.सुपर स्पेशलिस्टने ३०० रुपये,स्पेशलीस्टने २०० रुपये तर एमबीबीएस डॉक्टरने १५० रुपये प्रथम तपासणी शुल्क आकारावे. दुसऱ्या दिवशी कोणतेही शुल्क (फेरतपासणी ) आकारू नये.त्याचप्रमाणे तपासणी शुल्काची पावती देणेही बंधनकारक केले आहे.

फीमध्ये एकवाक्यता हवी
शहराततीन दशकांपासून प्रॅक्टिस करणाऱ्या काही उच्चशिक्षित डाॅक्टरांची फी ३० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत आहे. तर काही नवोदित डाॅक्टरांची फी ३०० रुपयांपासून ५०० रूपयांपर्यत आहे. अनुभव, कौशल्य आणि शिक्षण या गोष्टीचा विचार करून आयएमने डाॅक्टरांच्या फीसंदर्भात वेगवेगळे गट करून फीमध्ये एकवाक्यता आणली पाहिजे, असे काही डाॅक्टरांना वाटते. डाॅक्टरांनी शिक्षणासाठी मोजलेली पैशांची आणि वेळेची किंमत, हाॅस्पिटल उभारण्यासाठी केलेली इंन्व्हेस्टमेंट या गाेष्टींऐवजी या पेक्षातील विश्वनियता, सेवा हा भावदेखील विचारात घेतला जावा, अशी भावना काही डाॅक्टरांनी ‘दिव्य मराठी’कडे नाव छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.

काउंटरवर फीचे फलक
कन्सल्टिंगरुमच्या बाहेरील भिंतीवर बहुतांश डाॅक्टरांनी फीचे कागद चिकटवले आहेत. कोऱ्या कागदावर प्रथम तपासणी फी, फेर तपासणी फी असे कागद लावले आहेत. फीत बदल झाल्यानंतर त्याच कागदावर नव्याने चिटोरा डकवले आहेत.

पावती नाही
कन्सल्टिंगमध्येएका डॉक्टरकडे दररोज सरासरी १५ ते ८० रुग्ण तपासणीसाठी येतात. डाॅक्टरांचा अनुभव, लोकप्रियता आणि उपचार पद्धतीवर रुग्णांची संख्या अवलंबून असते. काही डाॅक्टर १०० पेक्षा अधिक बाह्यरुग्ण तपासणी करतात. या सर्वच डाॅक्टरांकडून आकारले जाणारे तपासणी शुल्क १०० रुपयांपासून सुरू होते. कुणी थेट ५०० तर कोठे ६०० रुपयेही आकारतो. फी आकारल्यानंतर परंपरागत खतावणीमध्ये किंवा एका वहीच्या पानावर त्याची नोंद ठेवली जाते. पेशंटला मात्र फी आकारल्याची पावती दिली जात नाही.
बातम्या आणखी आहेत...