आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लाख विद्यार्थ्यांना डाॅक्टरांनी दिली व्यसनमुक्तीची शपथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विद्यार्थी तंबाखू, गुटख्याच्या व्यसनापासून दूर राहावा यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील काही डाॅक्टरांनी जनजागृतीचे कार्य सुरू केले अाहे. या अभिनव उपक्रमांतर्गत त्यांनी अातापर्यंत दाेन लाख विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली अाहे. जळगाव जिल्ह्यात झालेली ही जनजागृती राज्यपातळीवर राबवण्यासाठी अाता डाॅक्टरांनी प्रयत्न सुरू केले अाहेत. डॉ.गाेविंद मंत्री, डॉ.नीलेश चांडक यांच्यासह शहरातील काही डॉक्टरांनी स्वयंप्रेरणेने या कार्यासाठी पुढाकार घेऊन ‘जळगाव पॅटर्न’ सेट केला आहे.
जिल्हा परिषद, पोलिस प्रशासन, शाळा, महाविद्यालयांच्या मदतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आहे. यात डॉ.गाेविंद मंत्री यांनी पुढाकार घेऊन २७ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या १८५० शाळांमधील लाख ८४ हजार मुलांना एकाच दिवशी व्यसनमुक्तीची शपथ दिली. या उपक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अास्तिककुमार पांडेय यांनी सहकार्य केले होते. या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी शपथ घेण्याचा हा उपक्रम पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात झाला. त्यानंतर सर्वच लोकप्रतिनिधींकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले आहे. यात लोकप्रतिनिधी आपापल्या परिसरातील व्यसनमुक्ती केंद्रांना मदत करतील, असे म्हणण्यात आले आहे.

महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला आहे. यात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मदतीने २४ महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात १० हजार २०० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन अभिप्राय अर्ज भरून दिले. यात व्यसनमुक्तीसाठी विचारण्यात आलेले तीन पर्याय देण्यात आले होते. त्यापैकी जनजागृतीने व्यसनमुक्ती होऊ शकते, असे मत ७० टक्के विद्यार्थ्यांनी मांडले आहे, तर २० टक्के विद्यार्थ्यांच्या मते स्वत:ची जाणीव, तर १० टक्के कडक कायदा केल्याने व्यसनमुक्ती होईल, असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ.मंत्री यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

फलकांमुळेझाली जनजागृती
जिल्हापरिषद शाळांच्या परिसरात तंबाखू गुटखाविक्री बंदीसंदर्भातील फलक लावण्यात आले. तसेच सिगारेट अॅण्ड अदर टोबॅको प्राॅडक्ट अॅक्ट २००३ची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरांमध्ये तंबाखू, गुटख्याच्या विक्रीवर प्रचंड प्रमाणात नियंत्रण अाल्याचे दिसून आले.
डॉ. गोविंद मंत्री यांचा गौरव करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अास्तिककुमार पांडेय.

व्हाॅट्सअॅप ग्रुपमुळे महिलेची शस्त्रक्रिया
डॉक्टरांनीगावकऱ्यांच्या मदतीने काही व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुपमध्ये तंबाखू, गुटखासेवनामुळे जर कुणाला कर्करोग हाेण्याची शक्यता असेल, तर अशा रुग्णांची माहिती एकत्रित केली जाते आहे. चहार्डी (ता.चाेपडा) येथील एका महिलेची माहिती समोर आल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या पथकाने तिच्यावर उपचार केले. व्हाॅट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून चांगला उपयोग झाल्याचे हे उत्तम उदाहरण ठरले अाहे.
बातम्या आणखी आहेत...