भुसावळ- येथील वरणगाव राेडवरील सुंदरनगरातील रहिवासी ३३ वर्षीय डॉक्टरने राहत्या घरात स्वत:ला विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. डाॅ. मनाेज अमाेघलाल नागराज (वय ३३) यांनी शनिवारी त्यांच्या राहत्या घरात विषारी इंजेक्शन टोचून घेतले. डाॅ. मनाेज नागराज यांचा सुंदरनगरातच दवाखाना होता. त्याच ठिकाणी त्यांनी आत्महत्या केली. बाजारपेठचे पाेलिस निरीक्षक चंद्रकांत सराेदे, उपनिरीक्षक विजय नरवाडे, किशाेर महाजन यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात अाली.