आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्याचा २४ जणांना चावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचा कालावधी कुत्र्यांचा प्रजननाचा असतो. हार्मोन्समधील बदलामुळे ते अधिक आक्रमक होतात. त्यामुळे असुरक्षित भावनेतून कुत्र्यांकडून चावा घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. मंगळवारी रात्री एकाच कुत्र्याने शहरातील सुभाष चौक, दाणा बाजारात २४ जणांना चावा घेतला. तसेच जिल्हा रुग्णालयात रोज श्वानदंश झालेल्या अनेकांना उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.
लहान मुलांचे लचके तोडण्याच्या घटना जिल्हाभरात रोजच घडत आहेत. गेल्या तीन महनि्यांत कुत्र्यांनी १३४ जणांना चावे घेतले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण बालकांचे आहे. गेल्या महनि्यात जामनेर येथील शांताराम सीताराम ढोले (वय ५०) यांना रेबीज हा आजार झाल्याने मुंबई येथील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले होते.

शारीरिक बदलांचा काळ
साधारणपणे जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महनि्यांचा कालावधी कुत्र्यांचा वयोमानानुसार प्रजननाचा असतो. या कालावधीत त्यांच्यात शारीरिक बदल होतात. त्यांच्या भावना बदलतात. त्यामुळे ते आक्रमक होतात. या कालावधीत ते अडथळा, विरोध सहन करू शकत नाहीत. हात उगारणे, दगड मारणे, अंगावर धावून जाणे, असे प्रकार घडल्यास ते हल्ला चढवतात. प्रामुख्याने या कालावधीत त्यांना असुरक्षिततेची भावना वाढीस लागते. त्यामुळे चाव्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

रेबीजच्या प्रतिबंधासाठी लसीकरण महत्त्वाचे
सर्वसाधारण कुत्र्यांच्याही लाळेत रेबीजचे जंतू असतात. त्यांनी चावा घेतल्यास रेबीज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कुत्र्यांचे लसीकरण करणे महत्त्वपूर्ण आहे. पाळीव कुत्र्यांना हे शक्य आहे, मात्र मोकाट कुत्र्यांना हे लसीकरण करणे शक्य होत नाही.
अँटी रेबीज लस उपलब्ध
जिल्हा सामान्य रुग्णालयात अँटी रेबीजच्या १६०० लसी उपलब्ध आहेत. त्यामुळे कुत्र्याने चावा घेतलेल्या रुग्णाला येथे उपचार करण्यासाठी काेणतीही अडचण नाही.
डॉ. किरण पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक

प्रजनन कालावधीमुळे आक्रमक
वर्षातून दोन वेळा कुत्र्यांचा प्रजनन कालावधी असतो. त्यातला एक जून ते ऑगस्टदरम्यान असतो. या काळात हार्मोन्समध्ये बदल होतात. त्यामुळे कुत्रे अाक्रमक हाेऊन चावे घेण्याचे प्रकार या काळात वाढतात.
डॉ. व्ही. टी. राईकवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
मंगळवारी यांना घेतला चावा
मंगळवारी भरत प्रल्हाद पाटील (वय ४५), सुरेश पांडुरंग कदम (वय ३२), िवजय रघुनाथ सैतवाल (वय ४०), देिवदास नामदेव तायडे (वय २३), िवजय मगन ठाकूर (वय ३७), प्रतिभा दिली मेढे (वय १३), सिंधू सुधाकर भावसार (वय ६७), लक्ष्मी मनोज पांचोले (वय १२), ओमप्रकाश धर्मराज लिखमाने (वय ४९), मन्सूर खान दिलावर खान (वय ९), अयुब खान समशेर खान (वय ९), भगवानदास झंवर (वय ७५), महंमद सादिक अब्दुल (वय २६), सुरेश वना कोळी (वय ३५), शेख रफिक शेख कालू (वय ६०), धनराज दिली राजपूर (वय २८), श्याममोहन छोटू मिस्तरी (वय २४), शेख आसिफ शेख दानिश (वय १०), प्रशांत सुरेश पाटील (वय १५), सय्यद इमाम सय्यद सादिक (वय ३०), युनूस खान युसूफ खान (६५ वय), मुमताज बी शेख हुसेन (वय ७०), शेख जमील शेख कय्युम (वय ४८), राजू पटेल (वय ४२) या २४ जणांचा कुत्र्याने चावा घेतला.