आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात मोकाट कुत्र्यांनी तोडले १४ जणांचे लचके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात मोकाट कुत्र्यांनी कहर केला आहे. सोमवारी मोकाट कुत्र्यांनी विविध भागातील चक्क १४ जणांचे लचके तोडल्याच्या घटना घडल्या. त्यात पाच लहान मुलांचा समावेश असून, गेल्या पंधरवड्यात ७६ जणांना कुत्र्यांनी चावे घेतले आहेत. अशा प्रकारच्या घटनांमध्ये दररोज वाढ होत असूनही याकडे महापालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष हाेत आहे.

तापमानात झालेली वाढ, कुत्र्यांच्या संख्येतील लक्षणीय वाढ आणि हार्मोन्समध्ये झालेल्या बदलांमुळे श्वानदंशाचे प्रमाण वाढले असल्याचे पशुतज्ज्ञांचे म्हणणे आहे. सर्वसाधारण कुत्र्याच्या लाळेतही रेबीजचे जंतू असतात. त्यांनी चावा घेतल्यास रेबीज होण्याचे प्रमाण नगण्य असले तरी, शक्यता मात्र नाकारता येत नाही. त्यामुळे रेबीजला प्रतिबंध घालण्यासाठी कुत्र्यांचे लसीकरण करणे आवश्यक असून, पाळीव कुत्र्यांबाबत हे शक्य आहे. कुत्रा चावल्यास त्यासाठी प्रतिबंधक म्हणून अँटिरेबीजची लस घेतली पाहिजे. जिल्हा सामान्य रुग्णालयात ही लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

यांना घेतला चावा
सोमवारी शहरातील विविध भागात १४ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला. यात निशा शिंपी (वय १९, रा.पिंप्राळा), कृष्णा पोतदार (वय ११), प्रकाश चव्हाण (वय ४५, रा.सुप्रीम कॉलनी), सलमाबी शरीफ शेख (वय ४०, रा.सुप्रीम कॉलनी), अजय वानखेडे (वय १८, रा.कांचननगर), गजानन सोनार (वय २४, रा.शिवाजीनगर), निहारबी जहार (वय ५, रा.मेहरूण), शुभम‌् पगारे (वय ७, रा.अमित कॉलनी), राजवर्धन सुरवाडे (वय ६), नीताबाई पाटील (वय ४०), भारती झंवर (वय ४०, रा.पिंप्राळा), शाहरुख शेख (वय २६, रा.कासमवाडी), सोपान कोळी (वय २४) हितेश चौधरी (वय ५).