आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dog Took Bite Of One And Half Year Child's Cheek

कुत्र्याने तोडले दीड वर्षीय बालकाच्या चेहऱ्याचे लचके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी सार्थक त्याची आई अर्चना.
जळगाव - पिंप्राळ्यातीलसिध्दिविनायक कॉलनीत सोमवारी दुपारी वाजेच्या सुमारास कुत्र्याने सार्थक रमेश सोनवणे या दीड वर्ष वयाच्या बालकाच्या अंगावर बसून चेहऱ्याचे लचके तोडले असून केवळ नाक डोळेच कुत्र्याच्या चाव्यातून वाचले. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

सार्थकला त्याची आई अर्चना यांनी कडेवर घेतलेले होते. शेजारील महिला बाहेर आल्याने त्यांच्यासोबत बोलण्यासाठी त्या गेटच्या बाहेर आल्या. शेजारील महिलांशी बोलत असताना त्यांनी सार्थकला खाली उतरवले. त्यावेळेस अचानक कुत्र्याने सार्थकवर हल्ला केला. त्याच्या अंगावर बसून कुत्र्याने चेहऱ्याचे लचके तोडले. त्यामुळे त्याच्या आईसह शेजारी महिला जोरात ओरडल्या. सार्थक जीवाच्या आकांताने ओरडत होता. त्याचा चेहरा अंग रक्तबंबाळ झालेले होते. महिलांनी कुत्र्याला हकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो लचके तोडतच होता. आपल्या बाळावर आलेले संकट दूर करण्यासाठी अर्चना सोनवणे यांनी कुत्र्याची मान हातात धरून दूर फेकले. या दरम्यान कुत्र्याने त्यांच्याही हाताला चावा घेतला. या कॉलनीमध्ये कुत्र्यांनी हैदोस घातला असून त्यांचा बंदोबस्तची मागणी होत आहे.