आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव शहरात वर्षभरात तब्बल 1 हजार 172 नागरिकांना चावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - शहरात वर्षभरात भटक्या कुत्र्यांनी तब्बल एक हजार 172 नागरिकांना चावा घेऊन जखमी केले आहे. यामुळे रात्री-अपरात्री घराबाहेर पडणेही मुश्किल झाले असून पालिकेने मोकाट कुत्र्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नाहीत. यामुळे शहरवासीयांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

भटक्या कुत्र्यांनी 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2013 या एक वर्षाच्या कालावधीत 946 तर 1 एप्रिल ते 30 जून या तीन महिन्यात तब्बल 126 नागरिकांना चावा घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयात कुत्रा चावल्यावर मोफत इंजेक्शन देऊन औषधोपचार केला जातो. त्यामुळे रुग्ण उपचारासाठी पालिका रुग्णालयात धाव घेतात. मात्र, गेल्या महिनाभरापासून पालिका रुग्णालयात रॅबीजच्या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. दरम्यान, रुग्णालयात महिनाभरापासून इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंजेक्शनसह इतर औषधांची मागणी पालिकेकडे केली आहे. लवकरच औषधसाठा उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तत्पूर्वी, बुधवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक युवराज लोणारी यांनी पालिका दवाखान्यात रॅबीजची लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. पावसाळ्यात कुत्रा चावल्याच्या घटना वाढतात. यामुळे वेळीच खबरदारी घेण्याबाबत सभेत चर्चा झाली होती.