आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Domestic Gas Cylinder Filling The Car Burned Cylinder And Car

गाडीत घरगुती गॅस भरताना सिलिंडर अन‌् गाडी पेटली; तिघे गंभीर भाजले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कांचन नगरात दिलीप किराणा स्टोअर्सजवळ मारुती ओमनीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस गाडीत भरत असताना सिलिंडरने अचानक पेट घेतला. यात गाडी पेटल्याने तिचे नुकसान झाले आहे. तसेच या अपघातात तीन जण गंभीर भाजले गेले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली.

कांचननगरातील आकाश गणेश बोरसे (वय २८) याच्या घरात शनिवारी रात्री ९.३० वाजता जामनेर येथील मारुती ओमनी (एमएच १९ एपी ३६६४) गॅस भरण्यासाठी आली होती. गाडीत घरगुती सिलिंडरमधून गॅस भरत असताना गाडीच्या टाकीला लावलेले रेग्युलेटर अचानक उडाले. त्यामुळे सिलिंडरमधील गॅस दुकानाच्या बाजूला असलेल्या गटारीत वाहू लागला. दुकानापासून काही अंतरावर असलेल्या एका पार्टेशनच्या घरात महिला चुलीवर स्वयंपाक करीत होती. गॅस गटारीतून वाहत-वाहत त्या घराजवळ पोहोचला. चुलीच्या आगीमुळे गॅसने अचानक पेट घेतला. ती आग सिलिंडरपर्यंत पोहोचली. त्यामुळे सिलिंडरसह मारुती ओमनीनेही पेट घेतला. यात आकाश बोरसे याचे पाय, हाताचे पंजे, गाडीचालक किरण पवार आिण त्याच्यासोबत असलेल्या तरुणाच्या हाताची बोटेही भाजली आहे. आकाशला उपचारासाठी भंगाळे हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने गॅस सिलिंडरचा स्फोट झाला नाही.

पोलिसांत गुन्हा नाही
याघटनेबाबत नागरिकांनी शनिपेठ पोलिसांना माहिती दिली होती. तरीदेखील रविवारपर्यंत याबाबत शनिपेठ पोिलस ठाण्यात काेणताही गुन्हा दाखल नव्हता.

हुडको परिसरात गॅस गळती
शिवाजीनगरहुडको भागातील इम्रान खान युसूफ खान यांच्या घरात गॅसगळती होऊन स्फोट झाल्याने आग लागली. यात सुमारे २० हजारांचे साहित्य जळून खाक झाले आहे. रविवारी सकाळी १०.१५ वाजता ही घटना घडली.