आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधी परस्पर वळवू नका; जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेच्या विकास कामांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांनी परस्पर वळता केल्याचा विषय थेट राज्यपातळीपर्यंत पाेहाेचला अाहे. त्यातूनच नगरविकास विभागाने खास नगरपालिका नगर परिषदांचा निधी परस्पर वळवण्याचे अादेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे शासनाने अादेश दिल्यास जळगाव पालिकेचा निधी पुन्हा मिळू शकणार अाहे.

जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी महापालिकेच्या विविध विकास कामांचा साडेअाठ काेटींचा निधी महसूलच्या थकबाकीपाेटी नुकताच वर्ग करून घेतला अाहे. त्यामुळे महापालिका महसूल विभागामध्ये वाद सुरू झाला आहे. शासनाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नगरपालिकेचा निधी परस्पर वळवू नये, असे अादेश देऊन दिलासा दिला असला तरी, जळगावातील जिल्हाधिकाऱ्यांनी हा अादेश येण्यापूर्वीच महापालिकेची रक्कम वर्ग केली हाेती. त्यामुळे महापालिकेचा हा निधी परत करण्यासाठी आता राज्य शासनाला नव्याने अादेश काढावे लागणार अाहेत.

अादेश मिळाल्यास निधी वर्ग करणार
महापालिकेच्या निधी संदर्भात मुख्यमंत्र्यांनीही विचारणा केली हाेती. निधी वर्ग करण्याबाबत वस्तुस्थिती मांडली. याबाबत नगरविकास विभागाचाही अादेश अाला अाहे; परंतु ताे १६ मार्चचा असून, त्याअाधीच मनपाचा निधी वर्ग झाला अाहे. जळगावसाेबतच भुसावळ नगरपालिकेची थकबाकीही वसूल केली असल्याने हा निधी परत करण्यासाठी शासनाने अादेश दिल्यास निर्णय घेता येईल. - रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी
बातम्या आणखी आहेत...