आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारच्या लॉकिंगची आता चिंताच नको!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - कधी कार लॉक करण्याचे टेन्शन तर कधी रिमोट खराब झाल्याने होणारी चिंता हा कारशौकिनांसाठी नेहमीचाच विषय आहे. या चिंतेतून दोन वेळा गाडीचे लॉक ओढून तपासण्याची पद्धतही आता अंगवळणी पडली आहे. ही समस्या लक्षात घेऊन कार अँसेसरीज बाजारात आलेल्या ‘इंटेलिजेंट इलेक्ट्रॉनिक लॉकिंग’मुळे कारशौकिनांना दिलासा मिळणार आहे. या सिस्टीममुळे तुम्ही कारच्या 10 फूट दूर जाताच कार लॉक होईल आणि तुम्ही 10 फुटाच्या रेंजमध्ये येताच गाडीचे लॉक उघडेल.

कार अँसेसरीज बाजारात वेगवेगळ्या गोष्टी ग्राहकांसाठी उपलब्ध असताना आता इंटेलिजेंट इलेक्ट्रॉनिक लॉकिंगमुळे कार लॉक आहे की नाही, याची चिंता करायचे आता कारण उरणार नाही. या सिस्टीममध्ये एक रिमोट आहे, त्याच्यासोबत कारची चाबी फिट केली जाईल. सेंसरच्या माध्यमातून ही सिस्टीम दोन्ही रिमोटच्या रेंजमध्ये राहील. हा रिमोट कारच्या 10 फूट रेंजमध्ये आल्यावर गाडीचे लॉक उघडेल. 10 फुटापुढे गेल्यास गाडी लॉक बंद होईल. याचा वाहनधारकांना फायदा होईल.
इंटेलिजेंट इलेक्ट्रॉनिक लॉकिंग सिस्टीम लावल्यावर वाहनचालक बिनधास्त असतो. शहरात ही सिस्टीम आलेली आहे. मात्र, त्याला अद्याप पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. इम्रान पिंजारी, विक्रेता.

8000 रुपयांचे इंटेलिजेंट लॉक
5500 रुपयांचे सेन्सर विथ कॅमेरा


सेन्सर सावधान करेल
कार अँसेसरीजमध्ये सेन्सर विथ कॅमेरादेखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यात चार सेंसरच्या माध्यमातून कारच्या मागील बाजूने एक कॅमेरा लावला जातो. त्याची स्क्रीन पुढे असते. कार मागे घेताना हा कॅमेरा आणि सेंसर कारच्या सुरक्षेची काळजी घेतो. सेन्सरच्या 10 मीटर क्षेत्रात कोणतीही वस्तू आली तर सेंसर बिप वाजवून तुम्हाला सावध करेल.