आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Vijaya Chaudhari Murder Case : Winteness Tung Sliped

डॉ. विजया चौधरी खून प्रकरण : माफीचा साक्षीदाराची वळली बोबडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - डॉ. विजया चौधरी खून खटल्यातील माफीचा साक्षीदार गुलाब भागवानीची न्यायालयात बोबडी वळली. भागवानीने दिलेल्या साक्षीवर प्रश्न उपस्थित होताच त्याला काय बोलावे तेच कळत नव्हते. त्याला चार महिन्यांनंतर शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

आरोपींचे वकील अँड. एस.एम.शर्मा यांनी मागील तारखेस भागवानी याची उलटतपासणी घेण्याचा अर्ज दिला होता. तो मान्य करण्यात आल्यामुळे भागवानीला शुक्रवारी न्यायाधीश पी.बी.आंबेकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. भागवानी याने खटल्यात माफीचा साक्षीदार होऊन न्यायालयात साक्ष दिली होती. त्याच्या साक्षीतील तांत्रिक मुद्यांवर अँड. शर्मा यांनी उलट तपासणी घेतली. आरोपी युवराज साबळे याचे कपडे, मोबाइल तसेच रजिस्टरच्या जप्तीचे पंच साक्षीदार रवींद्र चौधरी यांचीही साक्ष नोंदविण्यात आली. त्यांनी आरोपींना ओळखले. मात्र, अँड. शर्मा यांनी उपस्थित केलेले मुद्दे चौधरी यांनी बरोबर असल्याचे सांगितले. सरकारतर्फे अँड. उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले.


अशी झाली प्रश्नांची सरबत्ती
भागवानी याने आधी दिलेल्या साक्षीप्रमाणे तो 12 मार्च रोजी गुन्हा घडल्यानंतर बाहेरगावी निघून गेला होता. 15 मार्च रोजी तो जळगावात आला, असे त्याने सांगितले होते. त्यानंतरच्या तपासणीत त्याने 14 रोजी मी स्मशानभूमीत हजर असल्याचे सांगितले. जर तो 14 मार्च रोजी जळगावात होता तर 15ला कोणत्या ठिकाणाहून शहरात आला? असा मुख्य प्रo्न अँड. शर्मा यांनी उपस्थित केला.