आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Vijaya Chaudhari Murder Case At Jalgaon Court Hearing

डॉ.विजया चौधरी खून खटला; साबळे हा शवविच्छेदनगृहातील कर्मचार्‍यांनाही करत होता मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- डॉ.विजया चौधरी खून प्रकरणातील संशयित आरोपी युवराज साबळे हा शवविच्छेदनगृहातील कर्मचार्‍यांना मदत करीत होता. तसेच शहरातील बेवारस प्रेत तो रुग्णालयात आणत होता. त्यामुळे त्याचा वावर सामान्य रुग्णालयात असायचा अशी माहिती तत्कालीन शल्यचिकित्सक डॉ.नरेंद्र राठोड यांनी मंगळवारी न्यायाधीश पी.डी.आंबेकर यांच्या न्यायालयात दिली.

संशयित आरोपी साबळे याने आपल्या बचावासाठी डॉ.नरेंद्र राठोड यांची तपासणी घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार मंगळवारी डॉ.राठोड न्यायालयात उपस्थित होते. सुरुवातीला आरोपीतर्फे अँड.मोहन पाटील यांनी तपासणी घेतली. तपासणीदरम्यान त्यांनी डॉ. चौधरी बेपत्ता झाल्या असल्यासंदर्भात रुग्णालयातील कर्मचारी अशोक पाटील यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीशी आपण सहमत आहात का? असा प्रश्न डॉ.राठोड यांना केला. यावर आपण त्या दिवशी अनुपस्थित होतो. पाटील यांनी तक्रार दिली असे माहीत होते, मात्र मी त्याच्याशी सहमत नाही असे उत्तर दिले.

राठोड यांची उलटतपासणी
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी डॉ.राठोड यांची उलटतपासणी घेतली. यात डॉ.राठोड यांना सांगितले की, 12 मार्च 2012 रोजी डॉ.विजया चौधरी यांची शवविच्छेदनगृहात ड्युटी लावली होती. त्यांनी दुपारी 2 ते 3 या वेळेत सुनीता विसपुते या महिलेचे शवविच्छेदन केले होते. त्या दिवशी करोसिया सुटीवर असल्यामुळे पवन जाधव हा एकटा मदतीला होता. युवराजचाही वावर शवविच्छेदनगृहात होता. मात्र, डॉ.चौधरी 12 मार्च रोजी ड्युटी संपल्यावर घरी जात असताना बेपत्ता झाल्याचा तर्क लावून पाटील यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीशी मी सहमत नाही.