आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Narendra Dabholkar Work Implementation In Jalgaon District

डॉ.नरेंद्र दाभोळकरांच्या कार्याला जळगावत यश, आता मनोरुग्ण मानसमित्रांकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जीवन बलिदान करणार्‍या डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या कार्याला जळगाव जिल्ह्यात यश येऊ लागले आहे. बुवाबाजीकडे जाणारे 200 पेक्षा अधिक रुग्णांवर गेल्या सहा महिन्यात चाळीसगावातील डॉ.नरेंद्र दाभोळकर मानसिक आधार केंद्रावर यशस्वी उपचार झाले असून ते आता मानसमित्रांचा सल्ला घेत आहेत.

अंधश्रद्धेमुळे अजूनही बुवाबाजीचा सर्वसामान्यांवर मोठा पगडा आहे. मनोरुग्णालाही मांत्रिकाकडे, धार्मिक स्थळांवर नेऊन त्यांच्यांवर उपचार केले जातात. यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राज्यभरात ‘मानसमित्र’ तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यानंतर राज्यातील पहिले मानसिक आधार केंद्र चाळीसगाव येथे रामोशीबाबा यांच्या दग्र्याजवळ सुरू करण्यात आले. सहा महिन्यांपासून केंद्रावर मानसिक आजाराबाबत मार्गदश्रन आणि उपचार सुरू आहेत. जवळपास येथे आलेल्या रुग्णांपैकी 75 टक्के रुग्णांमध्ये उपचाराने सुधारणा झाली आहे. महिन्यातून एकदा मानसोपचार तज्ज्ञ रुग्णांची तपासणी व औषधोपचार मोफत करतात. येत्या काही दिवसांत महिनाभरात दोन वेळा तपासणी केली जाणार आहे. सहा महिन्यांत 200 हून अधिक मानसिक रुग्णांमध्ये जागृती घडवून त्यांना अंधश्रद्धेच्या जाचातून मुक्त केले आहे. आता या केंद्राचा प्रतिसाद लक्षात घेऊन त्याची अंमलबजावणी राज्यभर केली जाणार आहे.

जनजागृतीने वळवले रुग्ण : चाळीसगावात केंद्र सुरू केले तेव्हा महिन्याला 30 रुग्ण होते. आता प्रत्येक माहिन्याला 50 पेक्षा अधिक रुग्ण या क्रेंद्रात उपचार घेत आहेत. यासाठी 12 मानसमित्र केंद्रावर कार्यरत आहेत. ते दग्र्यावर जाऊनही अंधश्रद्धेबाबत रुग्णांमध्ये जनजागृती करीत आहेत. केंद्रात येणार्‍या मनोरुग्णांवर उपचारासोबतच त्यांच्या नातेवाइकांना मार्गदश्रन करीत आहे.

आपल्याकडे मानसिक आजारांसाठी आजही सुविधा नाहीत. त्यातच अंधद्धेच्या पगड्यामुळे मानसिक विकाराचे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये मानसमित्रांकडून प्रबोधन केले जात आहे. या केंद्रावर मुंबई, गुजरात येथून रुग्ण येत आहेत. डॉ.प्रदीप जोशी,मनोसपचार तज्ज्ञ