आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Program In Jalgaon

महापरिनिर्वाण दिन! महामानवापुढे जनसागर नतमस्तक; मेणबत्त्या पेटवून दिला शांततेचा संदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव । भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील विविध संस्था, संघटना शासकीय कार्यालयांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातून डॉ.आंबेडकरांच्या कार्याचे स्मरण करून देत अहिंसा व शांतीचा संदेश देण्यात आला.
साईछत्र युवक मंडळ : वाघनगरातील साईछत्र युवक मंडळातर्फे साईछत्र चौकात कार्यक्रम झाला. यावेळी प्रतिमेसमोर मेणबत्त्या पेटवून शांततेचा संदेश देण्यात आला. राकेश पाटील, प्रदीप सोनवणे, मनोज बिर्‍हाडे, अमन तडवी, राजू पाटील, प्रवीण सपकाळे, सुबोध सपकाळे, के.आर. पाटील आदी उपस्थित होते.
भारिप बहुजन महासंघ : भारतीय बहुजन महासंघातर्फे अभिवादन सभा झाली. जिल्हाध्यक्ष मुकुंद नन्नवरे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष वसंत सपकाळे, उपाध्यक्ष बाबुराव वाघ, प्रा.यशवंत मोरे, प्रा. सुहास बागूल यांनी मनोगत व्यक्त केले. मुस्लीम आघाडीचे महानगराध्यक्ष रफिक शहा, भरत जाधव, भगवान बाविस्कर, आत्माराम अहिरे, अंबादास सोनवणे, सरिता मोरे, साबिया शेख, अमित बारसे, मयूर चौधरी, खंडू सपकाळे उपस्थित होते.
महावितरण कार्यालय : महावितरण परिमंडळ अभियंता प्रसाद रेशमे यांनी डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी अधीक्षक अभियंता अशोक शिंदे, कार्यकारी अभियंता मनोहर लांडे, व्यवस्थापक सुरेश बागले, शंकर पहाडे, रामचंद्र वैदकर, देवेंद्र उंबरकर, सिद्धार्थ लोखंडे, जनसंपर्क अधिकारी अविनाश साखरे, अर्जुन विसावे, मृदुला पाटील, ज्योती सोनवणे, संध्या चित्रे उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महानगराध्यक्ष मनोज चौधरी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी टीईटी मार्गदर्शन शिबिराचा समारोपही झाला. पक्षाचे उपाध्यक्ष वाल्मीक पाटील, प्रा.गुलशन बेलदार, प्रदेश उपाध्यक्षा मंगला पाटील, नीलेश पाटील, रणजित गव्हाळे, सलीम इनामदार, लता मोरे, लीलाधर तायडे, अँड. राजेश गोयर, रवींद्र जवरे, घनश्याम खैरनार उपस्थित होते.
भारत मुक्ती मोर्चा : भारत मुक्ती मोर्चातर्फे रेल्वेस्थानकाजवळील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी डॉ.आंबेडकरांच्या कार्याची माहिती दिली. संजय सपकाळे, दत्तू तायडे, बापू निकम, प्रदीप सपकाळे, चंद्रकांत नन्नवरे, प्रभाकर सुरवाडे, यादव बाविस्कर उपस्थित होते.
बहुजन शिक्षकेतर संसद : बहुजन शिक्षक संसदेतर्फे अभिवादन सभा झाली. राज्य उपाध्यक्ष प्रा.डॉ.सी.पी.लभाणे यांनी पुष्पहार अर्पण केला. प्रा. देवेंद्र इंगळे, प्रा. विजय स्थूल, प्रा. संजय हिंगोणेकर, डॉ.जुगल दुबे, प्रा.अशोक पाटील, प्रा. बालाजी राऊत उपस्थित होते.
नवलधाम बहुद्देशीय संस्था : संस्थेतर्फे पोलिस विभागाचे समुपदेशक मिलिंद केदार, संदीप ढंढोरे यांनी प्रतिमेस माल्यार्पण केले. बन्सी डाबोरे, सुभाष बेंडवाल, नाना सपकाळे, अनुप ढंढोरे, सुभाष पवार, संदीप र्मदाने, संतोष अटवाल, सिद्धार्थ करोसिया, अतिश हंसकर, बंटी चव्हाण उपस्थित होते.
येथेही झाला कार्यक्रम
ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय,जय बालाजी बहुउद्देशीय संस्था, रत्ना जैन प्राथमिक विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय भादली बुद्रूक, शा.ल.खडके प्राथमिक विद्यालय,रावसाहेब रूपचंद विद्यालय, अभिनव प्राथमिक विद्यालय, मूळजी जेठा महाविद्यालय, यादव देवचंद पाटील विद्यालय, माध्यमिक विद्यालय मेहरूण, भीमसेना, भा.का.लाठी विद्यालय, नंदिनीबाई वामनराव विद्यालय, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, मातोर्शी प्राथमिक विद्यालय, बी.एम.जैन प्राथमिक विद्यालय, जिल्हा अनुसूचित काँग्रेस कमिटी, गिरिजाबाई नथूसेठ चांदसरकर बालमोहन मराठी शाळा, अभिनव विद्यालय प्रतापनगर, चांदसरकर अध्यापक विद्यालय, खान्देश कलावंत समूह, भारतीय दलित हक्क संघर्ष समिती, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, महाराणा प्रताप विद्यालय, खान्देश एल्गार.