आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Prakash Amte Lecture In Sant Gadge Baba Lecture Series

संत अन् आदर्श शब्‍दांची आता भीती वाटते; डॉ. प्रकाश आमटे यांचे मत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- आयुष्याच्या वाटचालीत उक्ती आणि कृतीत कधीच विसंगती निर्माण होऊ दिली नाही. म्हणूनच तर कधी काळी दूर पळणार्‍या आदिवासींचा आमच्यावर विश्वास बसला आहे. लोकबिरादरी प्रकल्पाला मिळत असलेले यश हे ‘जिथे असाल तिथे निष्ठेने काम करा’, असा संदेश देणारे आहे. सेवा कार्य मांडण्याचा प्रयत्न करताना संत अन् आदर्श शब्द उच्चारण्याचीही भीती वाटते, अशी भावना डॉ. प्रकाश आमटे यांनी येथे व्यक्त केली.
र्शी संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय, दैनिक ‘दिव्य मराठी’ व रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प रविवारी त्यांनी गुंफले. त्यात ‘प्रकाशवाटा’ या विषयावर त्यांनी र्शोत्यांशी संवाद साधला. विचारपीठावर डॉ. मंदाकिनी आमटे, प्राचार्य डॉ. आर. पी. सिंग, हिंदी सेवा मंडळाच्या सचिव र्शीमती एम. डी. शर्मा, कोषाध्यक्ष अँड. एम. डी. तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा. गिरीश कुलकर्णी यांनी केले.
व्याख्यानात डॉ. प्रकाश आमटे म्हणाले की, वडील स्वर्गीय बाबा आमटे हे 1970 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगलातील हेमलकसा या ठिकाणी निसर्ग दर्शनासाठी घेऊन गेले होते. माडिया आणि गोंड आदिवासी बंधू-भगिनींसाठी सेवा कार्य सुरू करण्याचा त्यांचा उद्देश होता. काही महिन्यांनंतर बाबांनी तेथे लोकबिरादरी प्रकल्प सुरू करण्याचा विषय मांडला. प्रकल्पाचे काम सांभाळण्याचा मी शब्द दिल्यानंतर पुढील प्रयत्न सुरू झाले. शासनाकडे या प्रकल्पासाठी 50 एकर जमिनीच्या मागणीसाठी कागदपत्रे पाठवली. दुर्दैवाने शासनाकडून दिरंगाई झाली. 1970 ते 1972 अशी दोन वर्षे पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी नागपूरला गेलो. तेथेच मंदाकिनीशी ओळख होऊन सूत जुळले अन् कालांतराने लग्नही केले. जर शासनाने सन 1970 मध्येच प्रकल्पासाठी जागा दिली असती तर कदाचित आजन्म ब्रrाचारी राहिलो असतो, असेही त्यांनी मिश्कीलपणे सांगितले.
प्रकल्पाविषयी थोडसं..
चार पायांचे वन्यप्राणी नव्हे तर दोन पायांचा माणूसच हिंस्त्र; उक्ती आणि कृतीत विसंगती ठेवू नका
समाजसेवक बाबा आमटे यांनी सुरू केलेला लोकबिरादरी प्रकल्पाचे काम त्यांच्यावर डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे यांनी सांभाळले आहे. आता डॉ. प्रकाश आमटे यांचे सुपुत्र डॉ. दिगंत व त्यांची पत्नी डॉ. अनघा ही तिसरी पिढी सेवाकार्यात सक्रिय झाली आहे.
लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध प्रदेश या राज्यातील 1 हजार गावातून रुग्ण मिळेल त्या मार्गाने चालत येतात. दरवर्षी कमीत कमी 45 हजार रुग्ण या विनामूल्य सेवेचा लाभ घेतात. सरकारी अनुदान नाही. सर्व खर्च देणगीतूनच केला जातो.
प्रकल्पात सन 1976 मध्ये पहिली शाळा सुरू झाली. त्यात सुरुवातीला फक्त 20 मुले होती. कालांतराने वाढत गेली. त्यातूनच पहिल्या तुकडीतील कन्ना मडावी नंतर पांडुरंग पुंगाटी, कोमटी दुर्वा, सुधाकर वाचामी, दिगंत आमटे हे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर झाले आहेत, ही अभिमानास्पद बाब समजायला हवी.
लोकबिरादरी आर्शमशाळा आता बालवाडी ते बारावीपर्यंत झाली आहे. या शाळेत आजमितीला 650 मुले आहेत. मुला-मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृहे आहेत. डॉ. जगन्नाथ वाणी यांच्या महाराष्ट्र सेवा समिती, कॅनडा व सीआयडीए यांच्या मदतीने ही वसतिगृहे उभारण्यात आली आहेत.