आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Aashish Patil Make World Record, Divya Marathi

डॉ. आशिष पाटील पुन्हा गिनीज बुकमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे -येथील तेजनक्ष हेल्थकेअर संचलित इन्स्टिट्यूट ऑफ युरोलॉजीतील तज्ज्ञ डॉ.आशिष रवंदळे - पाटील यांची दुसर्‍यांदा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

42 वर्षीय मंगला मोहन माळी यांची शस्त्रक्रिया करण्यात आली असता 33.72 बाय 14.14 बाय 15.05 सेंटिमीटर आकाराची व 2.14 किलो वजनाची डावी किडनी यशस्वीपणे काढण्यात आल्याने डॉ. आशिष पाटील यांची दुसर्‍यांदा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. मंगला माळी यांना धुळयात पोटदुखी आणि मूत्रमार्गासंबंधी तक्रारीसाठी दाखविले होते. डॉ. आशिष पाटील यांनी त्यांच्या आजाराचे निदान करून त्यांची निकामी झालेली किडनी काढण्याचा सल्ला दिला होता.