आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Ulhas Patil Medical College Student Suicide Attempt

बाबा मला माफ करा, म्हणत मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थीनीने घेतला गळफास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शिक्षण घेण्यासाठी हजारो किलोमीटर दूरवर येऊन अनोळखींना मित्र बनवत वसतिगृहात राहून शिक्षण घेत असताना एकमेकांच्या अडचणी शेअर करण्याचा एक अदृश्य नियमच रूममेटमध्ये असतो. मात्र, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पश्चिम बंगाल येथील प्रियंका मुखर्जी या विद्यार्थिनीने आपल्या आत्महत्येस तिच्या खोलीत राहणार्‍या तीन विद्यार्थिनी जबाबदार आहेत, तसे तिने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. त्यामुळे प्रियंकाने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली की वेगळेच कारण आहे? याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.

तिघे प्रथम वर्षाला
प्रियंका सोबत राहणार्‍या तिन्ही मुली प्रथम वर्षाला आहेत. यातील प्रिया पवार ही वर्धाहून, स्नेहल महाजन पनवेलहून, प्रियंका काबरा ही जालन्याहून जळगावात शिक्षणासाठी आली आहे.

मैत्रिणींनी फेटाळला आरोप
घटना उघडकीस आल्यानंतर रविवारी महाविद्यालयात प्रियंकाच्या रूममेट आणि त्यांचे पालक हजर झाले होते. त्या मुलींनी मयत प्रियंकाशी आपले संबंध खराब नसल्याचे सांगितले. तसेच तिच्या मृत्यूबद्दल आम्हाला धक्का बसला असून तिने मृत्यूपूर्वी चिठ्ठीत आमची नावे लिहिली आहे, याचेच आम्हाला आश्चर्य वाटते. प्रियंका अभ्यासात कमकुवत असल्यामुळे तिने असे केले असावे, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

मृत्यूपूर्वी प्रियंकाने लिहिल्या तीन चिठ्ठय़ा
मृत्यूपूर्वी प्रियंकाने तीन चिठ्ठय़ा लिहिल्या आहेत. यात तिने रूममेट प्रिया पवार, स्नेहल महाजन आणि प्रियंका काबरा यांनी आपला आनंद, स्वप्न हिरावून घेतल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळेच आपण आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियंका आणि प्रिया यांनी मला खूप टॉर्चर केले, असे तिने लिहिले आहे. प्रियंकाच्या खोलीतून आणखी दोन चिठ्ठय़ा मिळून आल्या आहेत. यातही तिने वरील तिघांवरच रोष व्यक्त केला आहे.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, प्रियंकाने चिठ्ठीत काय लिहिले..