आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुटुंबात सकारात्मक विचार ठेवा : डॉ.गर्गे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- हल्ली विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. अशा घटनांची सुरुवात नकारात्मकतेतून होते. कुटुंबात सकारात्मक विचार ठेवल्यास मुलांवर चांगले संस्कार होतात. त्यामुळे मुलांना नकारात्मक विचारांपासून दूर ठेवा, असे प्रतिपादन डॉ.विशाखा गर्गे यांनी केले.अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाच्या मुख्य शाखेतर्फे शनिवारी जैन संघटना हॉलमध्ये ‘मुलांमधील वाढते नैराश्य’ विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. या वेळी सुषमा बाहेती, प्रविणा मुंदडा आदी उपस्थित होत्या.
डॉ.गर्गे म्हणाल्या की, पालकच मुलांना घडवत असतात. आपण जसे त्यांच्याशी वागू, जसे घरात वातावरण ठेवू त्याचप्रमाणे मुले घडतात. मुलांनी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायला हव्या अशा प्रकारे त्यांच्याशी संवाद साधा. तसेच प्रत्येक महिलेने आपल्या मुलांचे मित्र व ते काय करतात याची माहिती ठेवावी. मुलांचे वाढदिवसही घरातच साजरे करावेत.12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या मानसिकतेत खूप बदल होत असतात.
त्यामुळे हा काळ त्यांना घडवण्याचा असतो. याच वयात मुलांना सगळ्या गोष्टी समजू लागतात. परिणामी, नकारात्मक तेकडे जाण्यासाठी हा काळ पोषक असतो. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी व सकारात्मकता ठेवा. तसेच मुलांना समजून घ्या. त्यांच्यावर दडपण टाकण्याऐवजी सात्त्विक विचार ठेवून त्यांच्याशी वागा, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी मंडळाच्या कोषाध्यक्षा अंशू अग्रवाल, साधना गांधी, गायत्री शर्मा, संतोष नवाल, प्रिया मंत्री, सुरेखा कोठारी, मनीषा काबरा, पूजा अग्रवाल, सुनीता मुंदडा आदी उपस्थित होत्या.